'कैची'ला मिळाला पुस्तकाचा आधार

संदीप रायपुरे
शुक्रवार, 8 जून 2018

गोंडपिपरी (चंद्रपूर): कुटंबाची अवस्था जेमतेमच... अशात वडिलांच्या लहानशा सलुनच्या दुकानात मदतीचा हात देण्यासाठी तो सरसावला. वेळ मिळेल तेव्हा हातात कैची घेतली कि काम सुरू. जस कामाचं तसचं अभ्यासाचही. आज (शुक्रवार) दहावीचा निकाल लागला अन् त्यांचा आंनद गगणात मावेनासा झाला. गेली दोन वर्ष सातत्याने आपल्या दुकानात काम करणा-या शिवमला दहावीत पंचाहत्तर टक्के गुण मिळाले. काम करत असताना 'डिक्टीशन' मिळविलेल्या शिवमच्या वेगळया यशाने गावात त्याचे कौतूक होत आहे.

गोंडपिपरीच्या इंदिरानगर प्रभागातील राजेश इन्नमवार हे जुन्या बसस्थानकाजवळ एका लहानशा ठेल्यात कटिंगचा व्यवसाय करतात. इन्नमवार याचं कुटुंब सामान्यच. त्यांचा मुलगा शिवम गेल्या दोन वर्षापासून दुकानात काम करायला लागला. शाळा झाली कि हातात कैची घ्यायची अनं कामाला लागायच. ग्राहकांच समाधान करण्यासोबतच वेळ मिळेल तेव्हा पुस्तक हातात घेउन अभ्यास करायचा. हा त्याचा नित्यक्रम. दोन वर्ष काम करता-करता यंदा त्याच दहावीच वर्ष आलं. पण कामाबरोबरच चांगला अभ्यासही त्याने केला. हातात कैची अनं पुस्तक अशा दोन्ही गोष्टींची त्याने जबरजस्त सांगळ बांधली. सुरवातीला त्याला केवळ दाढीच करता येत होती. पण लवकरच त्याने कटिंग करण्याचे कौशल्य हस्तगत केले.

गेल्या काही दिवसापासून त्याला निकालाबाबत उत्सुकता होती. येथील जनता विद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. आज निकाल जाहिर झाला अन् त्याला 75 टक्के गुण मिळाल्याची माहिती समोर आली. गोंडपिपरीच्या जनता विद्यालयातील 35 मुलांना 75 टक्क्याहून अधिक गुण मिळाले. त्यात शिवमचाही समावेश आहे. एवढे गुण मिळविणा-या शिवमच्या यशाकडे वेगळया अर्थाने बघितले जात आहे. त्याच्या या यशामुळे गावातील अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. कुटुंबियातही आंनद पसरला आहे.

शिवमला मिळालेले यश हे वेगळया अर्थाने महत्वपुर्ण आहे. कुटुंबियांना मदतीचा हात देताना त्याने अभ्यासाला दुर सारले नाही. आज त्याचा चांगला परिणाम दिसून आला.
- एस. एन. पेंढारकर, प्राचार्य जनता विद्यालय, गोंडपिपरी.

Web Title: shivam innamwar 75 percent in ssc class