अकोल्यात शिवसंग्रामचे "भीक मांगो' आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

अकोला - अकोला जिल्हा प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांविरुद्ध "शिवसंग्राम' संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी बुधवारी बसस्थानक चौकात "भीक मांगो' आंदोलन केले. या वेळी भिकेतून मिळालेले 480 रुपये जिल्हा विपणन अधिकाऱ्यांना देऊन प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना "अच्छे दिन'चे स्वप्न दाखवीत सत्ताधारी भाजप सरकारने अनेक शेतकरीविरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला "बुरे दिन' दाखविले आहेत. वाढती महागाई आणि सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येकडे वळल्याचा आरोपही संघाने केला.

Web Title: shivsangram bhik mango andolan