
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकर्यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असताना भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलना मागे चीन व पाकिस्तानचा हात आहे, असे वक्तव्य केले होते.
तिवसा ( जि. अमरावती ) : भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात आज तिवसा शहरात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी दानवे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले. तसेच शहरातील शिवसैनिकांनी भाजप विरोधात नारेबाजी करत निषेध केला.
हेही वाचा - वर्ध्यातील पक्षी वैभवात भर, प्रथमच आढळले नयनसरी बदक
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. शेतकर्यांच्या आंदोलनाला राज्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असताना भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीच्या शेतकरी आंदोलना मागे चीन व पाकिस्तानचा हात आहे, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे तिवसा येथे जुन्या नगरपंचायत कार्यालयासमोर शिवसेनेचे वतीने रावसाहेब दानवे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
हेही वाचा - उपराजधानीत ऑनर किलिंग : बहिणीच्या प्रियकराचा भावाने केला खून; तीन दिवसांतील तिसरे हत्याकांड
पेट्रोल व डिझेल दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तत्काळ दरवाढ कमी करावी तसेच भाजपाविरोधात शिवसेनेचे वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांच्या फोटोला काळे फासून निषेध केला.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्याम देशमुख, आशिष धर्माळे, माजी नगरसेवक प्रदीप गौरखेडे, धनराज थूल, शहर प्रमुख अमोल पाटील, प्रकाश पडोळे, रुपेश पुरी, अजय आमले, सतीश देशमुख, रमेश वानखडे यासह शिवसैनिक उपस्थित होते.