पिक्‍चर अभी बाकी है... मेरे दोस्त

राजेश चरपे
गुरुवार, 26 जानेवारी 2017

नागपूर - इच्छुकांचा मिळत असलेला प्रतिसाद तसेच  संपर्कात असलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या इच्छुक पदाधिकारी, आज-माजी नगरसेवकांची माहिती व्हायरल करून युतीची गरज नाही असे म्हणणाऱ्या आपला मित्र भाजपला पिक्‍चर अभी बाकी है.... असाच इशारा शिवसेनेच्या वतीने दिला जात आहे. 

महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीची शक्‍यता जवळपास मावळली आहे. मुंबईत शिवसेनेची ताकद असल्याने फक्त चर्चेचा घोळ घातल्या जात आहे. नागपूरमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी युतीची गरज नाही असे थेट शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगून टाकले आहे.

शहरात शिवसेनेचे फक्त सहा नगरसेवक आहेत. यातील दोन काँग्रेसवासी झाले आहेत. उरलेल्या चारमध्ये आपसात फारसे पटत नाही. बडे नेते लक्ष घालत नसल्याने शिवसेनेला सर्व प्रभागात उमेदवारही मिळणार नाही असा तर्क लावल्या जात होता. दुसरीकडे पक्षपातळीवरसुद्धा फारसे कोणी गांभीर्याने घेत नसल्याने सैनिकांमध्ये मरगळ आली होती. मात्र, महापालिकेची निवडणूक जाहीर होताच शिवसेनेकडे तिकीट मागणाऱ्यांची चांगलीच गर्दी उसळली. 

सुमारे साडेपाचशे इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. यापैकी अनेकांमध्ये विजयी होण्याची क्षमता आहे. काही चांगले कार्यकर्ते, समाजसेवक आहेत. स्वतःच्या नावावर चारदोन हजार मते खेचून आणू शकतील इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे नेते चांगलेच प्रफुल्लित झाले आहे. मरगळ झटकून सर्वचजण कामाला लागले आहेत. कालपर्यंत शिवसेनेला दुय्यम स्थान देणाऱ्या भाजपला आपली ताकद दाखवून देण्याचा संकल्प केला आहे.  

काँग्रेसच्या नेत्यांमधील गटबाजीला अनेकजण कंटाळले आहेत. नेत्यांच्या भांडणात आपला  निभाव लागणार नाही असे दिसत असल्याने अनेकांनी आधीच शिवसेनेशी संपर्क साधला आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली आहे. चारचा प्रभाग झाल्याने अनेक बडे नगरसेवक एकत्र आले आहेत. यामुळे नाईलाजाने काहींना बसावे लागणार आहे. यातही खुल्या जागांवर संघाचे स्वयंसेवक दावा करीत असल्याने अनेक वर्षे सांभाळून ठेवलेला प्रभाग दुसऱ्याकडे सोपवला जाणार असल्याने काही नगरसेवक अस्वस्थ आहेत. 

काही वजनदार नगरसेवक आरक्षणाच्या अडचणींमुळे पक्षातील वजन वापरून दुसऱ्यांच्या प्रभागात घुसखोरी  करीत आहेत. धोक्‍याची घंटा वाजू लागल्याने भाजपचे नगरसेवक तसेच अनेक वर्षांपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले पदाधिकारी भगव्याशी निष्ठा कायम ठेवून शिवधनुष्य उचलण्यास तयार असल्याचे कळते. 

शिवसेनेकडे भरपूर चांगल्या तसेच विजयाची क्षमता असलेल्या उमेदवारांनी दावेदारी दाखल केली आहे. इतर पक्षातील इच्छुक संपर्कात आहेत. त्यांची क्षमता तपासून उमेदवारी दिली जाईल. आम्हाला कमी लेखणाऱ्यांना आमची ताकद निवडणुकीत दाखवून देऊ. आमच्या नगसेवकांची संख्या तीन पटीने वाढेल
- सतीश हरडे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

Web Title: shivsena warning to bjp