शिवस्मारकाचा 24 डिसेंबरला जलसोहळा - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - मुंबईतील अरबी समुद्रात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीतील अडथळे दूर झाले असून, येत्या 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलसोहळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.
शिवस्मारकाच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी देशभरातील 70 नद्यांमधील पाणी; तसेच पवित्र स्थळावरील माती आणण्यात येणार आहे.

राजभवनापासून एक किलोमीटर आणि मरीन ड्राइव्हपासून चार किलोमीटर लांब आहे. येथे शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे राहणार असून, सुमारे 15.96 हेक्‍टरवर हे स्मारक असेल, असे फडणवीस यांनी सांगितले. समुद्राच्या भरतीचा विचार केल्यानंतर सामान्य स्थितीत जी जागा स्मारकासाठी योग्य वाटत होती, त्या जागेचा अभ्यास करून ती निवडण्यात आली, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

Web Title: shivsmarak jalsohala