esakal | धक्कादायक! दिग्रसमध्ये २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! दिग्रसमध्ये २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! दिग्रसमध्ये २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिग्रस : शहरातील पुसद-दिग्रस पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या शेतातील एका झाडाला एका २० वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.३ सप्टेंबर) दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली. दर्शीत उमेश दुधे, रा.दारव्हा ह.मु.बारीपुरा, दिग्रस, असे मृतक युवकाचे नाव आहे.

हेही वाचा: चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर; सोमवारी समिती सदस्यांची बैठक

याबाबत अधिक माहिती अशी की, दिग्रस-पुसद पुलाच्या उजव्या बाजूला असलेल्या शेतातील एका झाडाला एक युवक गळफास घेत असल्याचे दिसले. पुलावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने आवाजाकडे दुर्लक्ष केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सदर घटनेची माहिती दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना मिळताच तात्काळ पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. सायंकाळी ६.३० वाजता वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन सुरुच होते. शुक्रवारी (ता.३ सप्टेंबर) सकाळीच त्याच्या आईच्या मावशीचा मृत्यू झाल्याने त्याची आई लाडखेड येथे अंत्यसंस्कारासाठी गेली होती. त्याच्या वडिलांचा गेल्या १९ वर्षाआधी मृत्यू झाला होता. त्यामुळे तो लहानपणापासुन आपल्या मामाकडे रहात होता. तो शिवाजी चौक परिसरात आलू, कांदे विकून आपल्या आईला घर चालवण्यास मदत करायचा.

हेही वाचा: चौकशी समितीचा अहवाल लांबणीवर; सोमवारी समिती सदस्यांची बैठक

आईला दर्शीतचा एकटाच आधार होता मात्र त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याने आता आई दर्शीतविना पोरकी झाली. बोलका स्वभाव व मनमिळावू वृत्ती यामुळे दर्शीत ने केलेल्या आत्महत्येची घटना ऐकून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सदर युवकाने आत्महत्या करण्याचे कठोर पाऊल का उचलले असावे याबाबतचे कोणतेही ठोस कारण वृत्त लिहेपर्यंत कळाले नव्हते. सदर घटनेचा पुढीप तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर, सहाय्यक उपनिरीक्षक गुणवंत गोटे, शालीक राठोड व पोलीस कर्मचारी करित आहेत.

loading image
go to top