धक्‍कादायक... 'कुपोषणमुक्त मेळघाट' कागदावरच 

file photo
file photo

अचलपूर, (जि. अमरावती) : मेळघाट या आदिवासीबहुल भागात कुपोषित बालके आणि बालमृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे सांगून सरकारी यंत्रणा पाठ थोपटून घेत असल्या तरी 1993 ते 2019 या काळात मातामृत्यू कुपोषण, संसर्गजन्य आजार, वैद्यकीय सुविधांची वानवा अशा विविध कारणांमुळे दहा हजारांवर बालकांनी जगाचा निरोप घेतल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आजही मेळघाट कुपोषणमुक्ती कागदावरच दिसून येत आहे. 
मेळघाटातील आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची जंत्री निरर्थक ठरल्याची भावना या भागात आहे हे बालमृत्यू कुपोषणामुळे झालेले नाहीत असा दावा शासनाच्या तर्फे सातत्याने करण्यात येतो. तर जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती, ऍन्सपेक्‍सिया, सेप्टिसिमिया यामुळे अर्भक मृत्युदर अधिक असून विविध आजारांमुळे शून्य ते सहा वर्षांपर्यंतच्या बालकांचे मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येते. सोबतच बालमृत्यू टाळण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना, आरोग्य संस्थेत प्रसूती, पोषण आहार, बालउपचार केंद्र, आशामार्फत गृहभेटीद्वारे पाठपुरावा, जंतनाशक व जीवनसत्त्व अ मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी, अशा उपाययोजना राबवण्यात येतात, पण अजूनही बालमृत्यूंचे प्रमाण कमी का झालेले नाही याचे उत्तर कुणाकडे नाही. 
मेळघाटात 1993 मध्ये कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा प्रश्न प्रसारमाध्यमांमधून चर्चेत आल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले होते. तेव्हापासून विविध योजनांचा मारा सुरू करण्यात आला. यामध्ये आरोग्य विभागासह आदिवासी विकास विभाग, महिला व बालविकास, कृषी, महसूल आणि इतरही विभागांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये ओतण्यात आले आहेत. पण यश आजही दिसून आले नाही. परिणामी कुपोषणाचा कलंक मेळघाटच्या माथ्यावरून पुसल्या गेलेले नाही. 


पोषण आहाराकडे लक्ष देणे गरजेचे 
कुपोषणमुक्त मेळघाटसाठी केवळ आरोग्य विभागावर ठपका ठेऊन चालणार नाही, त्यासाठी पोषक आहाराकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, जोपर्यंत सुदृढ बालक जन्माला येणार नाही तोपर्यंत कुपोषणमुक्त मेळघाट होण्यास विलंब लागणार आहे. मेळघाटात कमी वजनाचे बालक जन्माला येण्याचे प्रमाण अधिक आहे, परिणामी कुपोषणमुक्तीसाठी आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
- डॉ. शशिकांत पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, धारणी. 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com