esakal | #SchoolFirstDay : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद; पालकांमध्ये भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Short response from students on the first day of school

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास शाळा व्यवस्थापन व मुख्यध्यापक जबाबदार असल्याने शाळा सुरू झाली असली तरी शाळा व्यवस्थापनात संभ्रम निर्माण झाला आहे. पालकांनी सरकारच्या शाळा सुरू करण्याचा निर्णयाला अल्प प्रतिसाद दिला आहे.

#SchoolFirstDay : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद; पालकांमध्ये भीती

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : कोरोना विषाणूजन्य रोगामुळे शाळेची घंटा १६ मार्चपासून बंद होती. मधात लॉकडाऊन शिथिल केले असता चार दिवस शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा फेर निर्णय सरकारने घेतला. आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल झाले. यामुळे सोमवारपासून (ता. २३) शाळा सुरू झाली. मात्र, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद दिसून आला.

शाळेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सुविधाची पूर्तता करण्यासाठी आवश्यक निधी नसल्याने व स्थानिक प्रशासनाने वर केलेले हात पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासनाने स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू किंवा बंद ठेवण्याचा सोपविल्याने कोणीही समोर यायला तयार नाही. प्रत्येकजण आपापली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

मुख्यध्यापकाला सर्वस्वी जबाबदारी दिली आहे. विद्यार्थ्यांची जबाबदारी निव्वळ मुख्याध्यापक कशी स्वीकारणार आहे. विद्यार्थी घरी किंवा गावात वावरत असताना कोणाच्या संपर्कात आलेला आणि कोरोना झाला हे मुख्यध्यापकांना कसे समजणार आहे.

विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास शाळा व्यवस्थापन व मुख्यध्यापक जबाबदार असल्याने शाळा सुरू झाली असली तरी शाळा व्यवस्थापनात संभ्रम निर्माण झाला आहे. पालकांनी सरकारच्या शाळा सुरू करण्याचा निर्णयाला अल्प प्रतिसाद दिला आहे.

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

पालकांनी निर्माण केले प्रश्नचिन्ह

कोरोनाची दुसरी लाट लक्षात पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास विरोध करीत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद दिसून आला. शाळा सुरू करण्याचा सरकारच्या निर्णयावर पालकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image