ऐन सणासुदीत सिलिंडरचा तुटवडा

राजेश प्रायकर
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

नागपूर : शहरात घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. वितरकांकडे नोंदणीच्या तुलनेत निम्मेच सिलिंडर उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत गृहिणींची डोकेदुखी वाढणार आहे. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहणार असल्याचे काही वितरकांनी नमूद केले. त्यामुळे नवरात्र, दसरा व त्यानंतर दिवाळीतही नागरिकांना सिलिंडरसाठी धावाधाव करावी लागणार आहे.

शहरात प्रामुख्याने हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत गॅस आणि इंडियन ऑइल कंपनीकडून एलपीजी गॅसचा पुरवठा केला जातो. शहराच्या विविध भागांतील गॅसधारकांना सिलिंडर मिळण्यासाठी खूप दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ग्राहकांना बुकिंगनंतर दोन ते तीन दिवसांत सिलिंडर मिळत होते. मात्र, सध्या नोंदणीनंतर सहा ते आठ दिवसांनंतर सिलिंडर उपलब्ध होत आहे. याबाबत एका गॅस सिलिंडर वितरकांकडे चौकशी केली असता, त्यानेदेखील दररोज 600 नागरिक सिलिंडरची नोंदणी करीत असून केवळ 300 सिलिंडर उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचे समाधान करणे कठीण झाल्याचे सांगितले. रविवारपासून नवरात्र प्रारंभ होत आहे. अनेकांकडे घटस्थापना होत आहे. त्यानंतर दसरा व दिवाळीत फराळ तयार करण्याचे वेध गृहिणींना लागतात. त्यामुळेही सिलिंडर गॅसचा वापर वाढतो. हिवाळ्यातही आंघोळीसाठी गरम पाणी करण्याकरिता सिलिंडर गॅसचा वापर वाढत असल्याने मागणी वाढते. त्यामुळे येत्या काळात गॅस सिलिंडरच्या तुटवड्याची समस्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shortage of lpg gas cylinder