श्रध्दा व दिनेश गहलोत यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

अमरावती ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर शिवसेनेला सोमवारी (ता.29) जोरदार धक्का बसला. दिनेश व श्रध्दा गहलोत (ठाकूर) या दाम्पत्याने समर्थकांसह सेनेला जय महाराष्ट्र ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत महिलांसह शंभरावर कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला.

भारतीय जनता पार्टीच्या राजापेठ येथील कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात दिनेश व श्रध्दा गहलोत ठाकूर या दाम्पत्यांसह समर्थकांना दुपट्टे घालून प्रवेश देण्यात आला. शहराचे आमदार डॉ. सुनील देशमुख, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, रवींद्र खांडेकर, किरण पातूरकर यांच्या उपस्थितीत ठाकूर दाम्पत्याने समर्थकांसह प्रवेश घेतला.
गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय असलेल्या श्रध्दा दिनेश गहलोत (ठाकूर) यांनी वर्ष 2016 मध्ये झालेली महापालिकेची निवडणूकही सेनेच्या चिन्हावर लढविली होती. महिला सेनेच्या उपजिल्हाप्रमुखदेखील होत्या. गत काही दिवसांपासून गहलोत परिवार व समर्थक शिवसेनेत अस्वस्थ होते. कार्यकर्त्यांसोबत झालेल्या चर्चा व विचारविमर्शानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला. सोमवारी अधिकृरित्या प्रवेश करून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला. यामुळे शहर शिवसेनेचे मोठे नुकसान झाले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shraddha and Dinesh Gehlot's Shiv Sena to Jai Maharashtra