शेगावात आजपासून श्रीराम नवमी उत्सव

लाखो भाविक भक्तांचे दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
Shri Rama Navami Utsav from today in Shegaon culture
Shri Rama Navami Utsav from today in Shegaon cultureSakal

शेगाव : लाखो भाविक भक्तांचे दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त येथील श्री गजानन महाराज संस्थांनमध्ये नऊ एप्रिल चैत्र शु. १ मंगळवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होईल.

श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये सकाळी ६ ते ६.४५ काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ५.१५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० महाराष्ट्रातील विविध नामवंत कीर्तनकार महाराजांचे कीर्तन होणार असून,

यामध्ये ९ एप्रिल मंगळवार रोजी ह.भ.प. अनंत बुवा बिडवे बार्शी, १० एप्रिल बुधवार रोजी ह.भ.प. राजेंद्र बुवा आंबेकर केकत निंभोरा, ११ एप्रिल गुरुवार रोजी ह.भ.प. बळीराम बुवा दौड अकोला, १२ एप्रिल शुक्रवार रोजी ह.भ.प.अनिरुद्ध बुवा क्षिरसागर,

सावरगांव माळ, १३ एप्रिल शनिवार ह.भ.प. गणेश बुवा हुंबाड महागांव, १४ एप्रिल रविवार रोजी ह.भ.प. प्रकाश बुवा शास्त्री धुळे, १५ एप्रिल सोमवार ह.भ.प. विठ्ठल बुवा राठोड आसोला ना., १६ एप्रिल मंगळवार ह.भ.प. पंकज बुवा गावंडे देहू,

१७ एप्रिल रोजी बुधवारला सकाळी मंदिरामध्ये १० ते १२ ह.भ.प. श्रीराम बुवा ठाकूर मु. परभणी यांचे तर रात्री ह.भ.प. श्रीहरी बुवा वैष्णव जालना यांचे रात्री "श्रीराम जन्मोत्सवाचे" कीर्तन होईल. या उत्सावात अध्यात्म रामायण स्वाहाकारास मिती चैत्र शु. ५ शनिवार १३ एप्रिलला प्रारंभ होऊन बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभृतस्नान होईल.

दुपारी उत्सवाची रथ, अश्वासह पालखी परिक्रमा निघेल. तर १८ एप्रिल रोजी गुरुवारला ह.भ.प. श्रीराम बुबा ठाकुर मु. परभणी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी गोपालकाला होऊन उत्सवाची सांगता होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com