हिंमत असेल तर भाजपवर राजद्रोहाचा आरोप करा - श्रीहरी अणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नागपूर - हिंमत असेल तर शिवसेनेने विदर्भाचे वेगळे राज्य करण्याचे जनतेला आश्‍वासन देणाऱ्या भाजपवर राजद्रोहाचा आरोप करावा, असे आव्हान देत विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक ॲड. श्रीहरी अणे यांनी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे विदर्भवादी व सेनेत आणखी संघर्षाची चिन्हे दिसून येत आहेत. 

वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून नुकताच शिवसेना-विदर्भवाद्यांत संघर्ष झाला. त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांनी महाराष्ट्र तोडणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई करण्याची मागणी केली होती. जाधव यांच्या वक्तव्यावरून ॲड. श्रीहरी अणे यांनी आज प्रसिद्धिपत्रकातून शिवसेनेवर हल्ला चढविला. बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करून घेण्याची शिवसेनेची मागणी जाधवांच्या वक्तव्यानुसार राजद्रोह ठरत नाही का, असा सवाल ॲड. अणे यांनी केला. 

१९५६ व १९६० मध्ये महाराष्ट्र निर्मितीसाठी विदर्भाचे राज्य तोडले. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्रवादीही देशातील पहिले गुन्हेगार ठरतात, असेही त्यांनी नमूद केले. मुळात राजद्रोह नावाचा कोणताही गुन्हा कायद्यात नाही. त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही. किंबहुना, घटनेतील कलम ३ व ४ नुसार प्रत्येक नागरिकाला राज्य मागण्याचा अधिकार आहे. 

त्यामुळे घटना दुरुस्ती करून राजद्रोहाचा कायदा केल्याशिवाय विदर्भवाद्यांना गुन्हेगार म्हणता येणार नाही, असे पत्रकात नमूद करीत ॲड. अणे यांनी जाधवांच्या अज्ञानावरही बोट ठेवले.

Web Title: shrihari ane talking