अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक : महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे रिंगणात

shrikant deshpande contest amravati teacher constituency election as a mahavikas aghadi candidate
shrikant deshpande contest amravati teacher constituency election as a mahavikas aghadi candidate

अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राज्याच्या महाविकास आघाडीकडून श्रीकांत देशपांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून ते गुरुवारी (ता.12) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्याने त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. 

श्रीकांत देशपांडे हे पूर्वीपासूनच शिवसेनेसोबत जुळलेले असून त्यांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले आहे. मागील निवडणूक त्यांनी शिक्षक आघाडीच्या बॅनरखाली लढवून विजय मिळविला होता. अमरावती शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच महाविकास आघाडीचे उमेदवारी श्रीकांत देशपांडे यांना मिळणार, अशी शक्‍यता होती. अखेर बुधवारी (ता.11) महाविकास आघाडीकडून शिवसेनेतर्फे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. मागासवर्गीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी शिवसेनेतर्फे दिला जाणारा एबी फॉर्म शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे व प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी सुपूर्द केला. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याने उमेदवारीसंदर्भात होणाऱ्या चर्चांना आता विराम मिळाला आहे. विशेष म्हणजे, भाजपने या मतदारसंघात आजवर कधीच उमेदवार दिलेला नाही. परंतु, यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उमेदवार दिल्याने दोन्ही महत्त्वाच्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आले आहेत. 

कोण आहेत श्रीकांत देशपांडे? -
प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी 2008 मध्ये शिक्षक आघाडीची स्थापना करून शिक्षकांच्या प्रश्‍नांसंदर्भात लढा सुरू केला. जून 2014 मध्ये ते शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांची ही दुसरी निवडणूक होती. 1996 ते 1999 या कालावधीत ते महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष होते, तर 1999 ते 2005 पर्यंत ते शिवसेनेचे विदर्भ विभाग संपर्कप्रमुख होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य, राज्य विशेषाधिकार समितीचे सदस्य, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारिणी सदस्य विधानपरिषद सदस्य (राज्यमंत्री दर्जा), अशी विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com