यवतमाळमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त राम मंदिराचा देखावा, दीड महिन्यापासून काम सुरू

रवींद्र शिंदे
Thursday, 15 October 2020

शनिवारी (ता.17) विधिवत संतोषी मातेची स्थापना करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी साडेसात वाजता मातेची आरती करण्यात येणार आहे. यावर्षी जय संतोषी माता मंडळाच्या वतीने रामजन्मभूमी येथे साकारण्यात येणार्‍या श्रीराम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधक राहणार आहे.

यवतमाळ : शहरातील नवरात्रोत्सव देशात दुसर्‍या क्रमांकाचा म्हणून ओळखला जातो. प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करीत शहरात नवरात्र उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. मेन रोड येथील जय संतोषी माता मंडळाचे 53वे वर्ष असून, यंदा राम मंदिराची देखणी प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यामुळे चंद्रपुरात शेकडो महिला विधवा, शासन योजनांच्या लाभापासून वंचित

शनिवारी (ता.17) विधिवत संतोषी मातेची स्थापना करण्यात येणार आहे. सकाळी साडेनऊ वाजता व सायंकाळी साडेसात वाजता मातेची आरती करण्यात येणार आहे. यावर्षी जय संतोषी माता मंडळाच्या वतीने रामजन्मभूमी येथे साकारण्यात येणार्‍या राम मंदिराची प्रतिकृती लक्षवेधक राहणार आहे. मागील दीड महिन्यापासून निर्माण कार्य सुरू आहे. भाविक भक्तांना सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नवरात्र उत्सवात सहभागी होता येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अमन बोरा यांनी दिली.

हेही वाचा - यवतमाळचा प्रसिद्ध दुर्गोत्सव पोहोचला सातासमुद्रापार; तरुणाने बनवली वेबसाइट; शंभराहून...

कार्यकारिणी स्थापन -
जय संतोषी माता मंडळाची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली आहे. त्यात अध्यक्षपदी अमन बोरा, उपाध्यक्ष निखिल जिरापुरे, मनीष लष्करी, सचिव नीरज सिंघानिया, कोषाध्यक्ष मुरली पवार, संघटक बाबू शहा, बाळू चौधरी, कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज पसारी, विजय बुंदेला, लकी राय, पराग गाढवे, राम जुपकवार, अरुण भुरचंडी , ललित जैन, राजू चिंधे, प्रतिक शहा, आशीष चोखाणी, सोनू राय, योगेश लष्करी, अजय बरखडा, गुणवंत इंदूरकर, किरीट पोद्दार, प्रसन्न सुराणा आदींचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shriram temple decoration on occsion of navaratra celebration in yavatmal