Shweta Kove Wins Gold at Asian Youth Para Games
esakal
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाची खेळाडू श्वेता कोवे हिने दुबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एशियन युथ पॅरा गेम्समध्ये 'पॅरा आर्चरी' या क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. श्वेता कोवे ही गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील नामवंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत श्वेता कोवे हिने उत्कृष्ट कौशल्य, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासोबतच तिने मिश्र प्रकारात कांस्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले.