

Chandrapur
esakial
सिंदेवाही: तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र वाढले आहे. सध्या शेतीकामांचे दिवस असल्याने शेतकरी आपल्या शेतातील कामे करण्यासाठी दररोज शेतावर जात आहे. अशातच सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या पळसगाव (जाट) येथे एक अंगावर काटा आणणारी थरारक घटना घडली. पत्नीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि समयसूचकतेमुळे एका शेतकऱ्याचे प्राण वाचले.