

Chandrapur
esakal
सिंदेवाही: तालुक्यातील पळसगाव (जाट) जवळील वळण मार्गावर गुरुवारी (ता.२) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास एका भीषण अपघाताची घटना घडली. राजुरा-तुमसर राज्य परिवहन मंडळाची बस आणि गिट्टीने भरलेला ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बसमधील अंदाजे ३१ प्रवासी जखमी झाले आहे. अपघात इतका भयानक होता की, दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असून वाहने एकमेकांमध्ये दबली गेली होती.