MPSC Exam : जिजाऊची लेक अश्विनी वनवे पहिल्याच प्रयत्नात झाली पोलीस उपनिरीक्षक

मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील जिजाऊच्या लेकीने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
Ashwini Vanave
Ashwini Vanavesakal

सिंदखेड राजा - मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील जिजाऊच्या लेकीने पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होवून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. तालुक्यातील हनवतखेड या छोट्याशा गांवातील अश्विनी शिवाजी वनवे यांनी वयाच्या २५ व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवली आहे.

त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन अथक प्रयत्नातून सर्व काही शक्य आहे हे अश्विनी यांनी सिद्ध केले आहे. अश्विनी वनवे यांची संपूर्ण महाराष्ट्रातील रँक २९९ असुन खुल्या महिला प्रवर्गातून १६ वी रँक आहे. आश्विनी यांच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेम असताना अत्यंत मेहनत, जिद्द, चिकाटीने अश्विनी यांनी अभ्यास केला.

पदवी झाल्यानंतर त्यांनी एमपीएससी देण्याचा निर्णय घेतला. चिकाटीने अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात अवघड असे यश मिळवले आहे. ग्रामीण भागात जन्म झाला असल्यामुळे हनवतखेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच पदवीच्या आश्विनी मधील जिद्द व चिकाटी पाहुन आई-वडील व भाऊ यांनी केला प्रोत्साहन दिले.

त्यामुळे आश्विनीला कुटूंबातील सदस्यामुळे आत्मविश्वास मिळाला सक्षम व समाजपयोगी कार्य करायचे असेल तर स्पर्धा परीक्षेतील सामोरे जाण्याचा निश्चय केला. बीएची २०१९ मध्ये पदवी पूर्ण केली. पदवीचे शिक्षण सुरू असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली होती.

पदवी पूर्ण होताच एमपीएससीची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी तयारी सुरू केली. स्पर्धा परीक्षेकरता सुरुवातीला पुण्यामध्ये क्लास जॉईन केला. त्यामुळे अभ्यासाची दिशा मिळाली, त्यानंतर स्वतः अभ्यासिकेमध्ये तासनतास अभ्यास सुरू करून यश संपादन केले आहे.

पोलिस प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर ग्रामीण भागातील शिक्षणाची अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आपला नेहमी प्रयत्न राहील असे अश्विनी वणवे यांनी सांगितले आहे. क्षमता असतानाही ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. पालकांनी मुलांबरोबरच मुलींनाही शिकवले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी दैनिक सकाळ सोबत बोलतांना व्यक्त केली आहे.

अश्विनीच्या यशात भावाचा मोठा वाटा :

आश्विनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक होणार आहे. तिच्या यशामध्ये तिचा भाऊ योगेश वनवे यांचा मोठा वाटा आहे. योगेश वणवे हे सैन्य दलामध्ये कॅप्टन या पदावर कार्यरत आहे. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रेरणा दिली. त्यामुळेच पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले असल्याचे आश्विनी वनवे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया :

स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्य,जिद्द व चिकाटी ठेवली तर यश मिळते. प्रशासकीय सेवेत अधिकारी व्हावे ही आई वडिलांची इच्छा होती, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमपीएससी परीक्षेची तयारी करून उत्तीर्ण झाली आहे. स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सातत्य अभ्यासांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच यशाचे गमक आहे.

- अश्विनी वनवे पोलीस उपनिरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com