Manoj Jarange Patil : माँ जिजाऊ सरकारला सदबुद्धी देवो वर्षानुवर्षे चाललेला अन्याय हा बंद झाला पाहिजे

मातृतीर्थ सिंदखेड राजा मध्ये राजमाता माँ जिजाऊ चरणी मनोज जरांगे-पाटील नतमस्तक.
Manoj jarange Patil
Manoj jarange Patilsakal

सिंदखेड राजा - राजमाता माँ जिजाऊ सरकारला सदबुद्धी देवो. वर्षानुवर्ष चाललेला अन्याय हा बंद झाला पाहिजे असल्याचे वक्तव्य मनोज जरांगे-पाटील यांनी मातृतीर्थ सिंदखेड राजा मध्ये केले आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या राजवाडा मध्ये जाऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.

शिवाजीनगर येथील टी पॉइंट ते लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यापर्यंत भव्य वाहन रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो बांधव सहभागी झाले होते. राजवाड्यामध्ये प्रवेश करतात महिलांनी औक्षण करून फटाक्याच्या आतषबाजीने स्वागत केले. राजमाता माँ जिजाऊ यांच्या दर्शन झाल्यानंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले की, राजमाता माँ साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.

त्यांच्या चरणी नतमस्तक झालो आहे. याच ठिकाणाहून जगाला स्वराज्य मिळाले, या ठिकणावरून प्रेरणा मिळाली माँ जिजाऊने बळ दिले आहे. राजमाता माँ जिजाऊ यांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.

आरक्षण हा कुणाचा विषय नाही, आरक्षण ही मक्तेदारी नाही, ही सुविधा आहे, जो समाज मागासलेला आहे. ज्या ज्या समाजाला व्यवसायाने आरक्षण दिले आहे. त्यामध्ये मराठा समाज आहे, सरकार म्हणून तुमची काही जबाबदारी आहे, पालकत्व तुमच्याकडे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

सरकार कोणाचेही असो, आंदोलनकर्ते या नात्याने विश्वास ठेवावाच लागतो, सरकारला आरक्षण द्यायचे नसते तर त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाच नसता. पाच हजार पानांचा आधार शासनाला दिला आहे. महाराष्ट्रातल्या सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे, शासन कायदा पारित करून आरक्षण देणार असल्याची आशा आम्हाला आहे.

विदर्भाच्या नातलगांच्या भूमीत आलो आहे, ही पवित्र भूमी आमच्या पाठीशी आहे. कारण आमच्या लेकरा बाळांचे कल्याण व्हावे त्यांची सुद्धा इच्छा आहे. मातृतीर्थच्या भूमीने अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे. विदर्भातील आमचे बांधव आमच्या पाठीशी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आमच्या पाठीशी उभे आहे, असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बीबी महामुने, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कुमार मालवी, प्रदीप पाटील ठाणेदार ब्रह्मदेव शेळके, ठाणेदार दत्तात्रय वाघमारे, ठाणेदार विकास पाटील, ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते व पदाधिकारी यांच्यासह नागरिक शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभा राहणार

ग्रामीण भागात ओबीसी बांधव व मराठा समाज हे एकत्र आहेत. हजारो ओबीसी बांधवांचे पाठिंब्याचे निवेदना आमच्याकडे आले आहेत. त्यांची इच्छा आहे गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे, हीच अपेक्षा ओबीसी बांधवांची आहे. त्यामुळे ओबीसी बांधव खांद्याला खांदा लावून आंदोलनात उभा राहणार असल्याचे मनोज जरांगे-पाटील यांनी बोलतांना सिंदखेड राजा केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com