कचऱ्यात सापडली सहा मृत अर्भके

शाम पाटील
सोमवार, 2 जुलै 2018

एका कचरापेटीत सहा मुर्त स्वरुपातील अर्भके अढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज (सोमवार) सकाळी कचरा साफ करताना नगरपालिका स्वच्छता कामगारांना ही अर्भके नवीन भाजीमंडई परिसरातील कचऱ्यात सापडली.

मलकापूर - येथील एका कचरापेटीत सहा मुर्त स्वरुपातील अर्भके अढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आज (सोमवार) सकाळी कचरा साफ करताना नगरपालिका स्वच्छता कामगारांना ही अर्भके नवीन भाजीमंडई परिसरातील कचऱ्यात सापडली.

आज (सोमवार) सकाळी नगरपालिकेचे स्वच्छता कामगार नविन भाजीमंडई परिसरातील कचरा सफाईसाठी गेले होते .कचरापेटीच्या जवळील कचरा खोऱ्याने भरत असताना एक मृत अर्भक दिसले त्याच्या जवळच प्लास्टीक डब्यात दुसरे मृत अर्भक असल्याचेही कामगारांना दिसले. त्यांनी याबाबतची माहिती मुकादम आबा पडवळ यांना दिली. यापैकी एक पुरुष तर दुसरे स्त्री जातीचे अर्भक आहे .

याशिवाय, ओळखू न येणारी चार अर्भके सापडली आहेत. बेकायदा गर्भलिंग निदान किंवा अनैतिक संबंधातून तयार झालेल्या अर्भकांची विल्हेवाट लावण्याच्या प्राकरातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा सर्वत्र आहे.

Web Title: Six dead babies found in the trash