esakal | गुरे चारायला गेले अन् सहाही जण वीज पडून गंभीर भाजले... 
sakal

बोलून बातमी शोधा

lightning

ते कारंजा तालुक्‍यातील पारडी (बोटोणा) येथील रहिवासी आहे. हे सर्व पारडी शिवारातील काटसावर परिसरातील पुंडलिक ढबाले यांच्या पडीक शेतात गुरे चारण्याकरिता गेले होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास कडाक्‍याच्या विजांसह जोरदार पाऊस झाला.

गुरे चारायला गेले अन् सहाही जण वीज पडून गंभीर भाजले... 

sakal_logo
By
दशरथ जाधव

आर्वी (जि. वर्धा) : लगतच्या पारडी (बोटोणा) येथे वीज कोसळून सहाजण गंभीर जखमी झाले. हे सहाही शेतकरी असून ते गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (ता.११) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

अशोक भीमराव सरोदे (वय ५५), शिरीष वसंतराव चाफले (वय ३५), युवराज बापूराव मानकर (वय ५५), निकेश वासुदेव भांगे (वय २४), स्वप्नील पुंडलिक ढवाले (वय २४), रामदास उकंडराव डायरे (वय ६०) अशी वीज पडून जखमी झालेल्यांची नावे आहेत. ते कारंजा तालुक्‍यातील पारडी (बोटोणा) येथील रहिवासी आहे. हे सर्व पारडी शिवारातील काटसावर परिसरातील पुंडलिक ढबाले यांच्या पडीक शेतात गुरे चारण्याकरिता गेले होते. 

अवश्य वाचा- बालगृहाला कंटाळून ती पडली बाहेर अन् रडत बसली रस्त्यावर....वाचा पुढे
 

दुपारी दोन वाजताच्या सुमारास कडाक्‍याच्या विजांसह जोरदार पाऊस झाला. पावसापासून बचाव करण्याकरिता हे सर्वजण एका झाडाखाली थांबले. त्याच सुमारास जोरदार वीज कडाडली. यात सहाजण जखमी झाले. यात काहींची पाठ, छाती, हात, मांड्‌यांना गंभीर इजा झाली. याची माहिती शेजारच्या शेतात असलेला शेतकरी मस्के यांनी गुणवंतराव मस्के यांना भ्रमणध्वनीवरून दिली. ते काही लोकांना सोबत घेऊन शेतात गेले.

अवश्य वाचा- आजही विनोबांचा आश्रम देतो स्वावलंबनाची प्रेरणा 
 

अशातच नाल्यालासुद्धा पूर आला होता. मात्र, जिवाची पर्वा न करता येथील नागरिकांनी भर पुरातून सर्वांना शेताबाहेर काढून ट्रॅक्‍टरने येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात डॉक्‍टर उज्ज्वल देवकांती यांनी लगेच प्राथमिक उपचार सुरू केले आहे. याची माहिती मिळताच भाजपचे शहर अध्यक्ष विनय डोळे यांनी रुग्णालय गाठत त्यांना मदत केली.  

संपादन ः राजेंद्र मारोटकर