सहाशेवर थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - महापालिका व ओसीडब्ल्यूने थकीत पाणीकरासाठी नळजोडणी बंद करण्याची कारवाई सुरू केली. आतापर्यंत सहाशे थकबाकीदारांचा पाणीपुरवठा बंद केला. एवढेच नव्हे, तर या मोहिमेतून 1 हजार 840 थकबाकीदारांकडून 1.97 कोटी वसूल केले. 

थकीत पाणी कर भरण्यासाठी ओसीब्ल्यू व महापालिकेने थकबाकीदारांना अनेकदा संधी दिली. परंतु, या संधीकडेही दुर्लक्ष करणाऱ्यांना धक्का देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. 3.56 कोटींची थकबाकी असलेल्या 609 ग्राहकांची नळजोडणी बंद करण्यात आली. महापालिका व ओसीडब्ल्यूने 25 मार्चपर्यंत लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक 103 ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद केला. या ग्राहकांकडे 48.92 लाख रुपये थकीत आहेत. वसुली मोहिमेअंतर्गत धरमपेठ झोनमध्ये सर्वाधिक 21.37 लाख रुपये वसूल केले. 

झोननिहाय कारवाई व वसूल 
झोन नळजोडणी बंद वसुली (लाखात) 
लक्ष्मीनगर 83 16.71 
धरमपेठ 72 21.37 
हनुमाननगर 58 10.22 
धंतोली 37 6.05 
नेहरूनगर 88 15.50 
गांधीबाग 21 7.92 
सतरंजीपुरा 3 4.27 
लकडगंज 103 5.92 
आशीनगर 23 2.46 
मंगळवारी 25 22.65 
बल्क नळ 96 84.46 

Web Title: Six hundered defaulters off the water supply