file photo
file photo

हवाई सुंदरीच्या नोकरीसाठी 6 लाख लुबाडणाऱ्याला अटक

अमरावती : एअर इंडिया, इंडिगो या विमान कंपन्यांमध्ये हवाई सुंदरीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये लुबाडणाऱ्याला फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी (ता. 19) रात्री अटक केली.
साहील इमरान शेख मेहमूद (वय 34 रा. कृषक कॉलनी, टाकळी, नागपूर) असे फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे दोन साथीदार डॉ. सुनील अंबादास जामोदकर (रा. अमरावती) व शारीक शेख मुश्‍ताक शेख (रा. नागपूर) हे दोघे पसार आहे. साहील इमरान यास नागपूर येथून अटक करून अमरावतीत आणले. फ्रेजरपुरा हद्दीत राहणाऱ्या कु. स्नेहा (वय 20) या युवतीला सन 2018 मध्ये एअर इंडिया किंवा इंडिगो एअरलाइन्स या विमान कंपन्यांकडे एअर होस्टेस पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर 10 एप्रिल 2018 ते मे 2019 या कालावधीत तीन ते चार टप्प्यामध्ये स्नेहा हिच्या वडिलांकडून या त्रिकुटाने एकूण सहा लाख रुपये घेतले. त्यानंतर दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षण व नियुक्तीचे बनावट आदेश काढून तिला दिले. ज्यावेळी सदर युवती हे आदेश घेऊन कंपनीच्या दिल्ली येथील कार्यालयात गेली तेव्हा कुणालाही अशी नियुक्ती देण्यात आली नसल्याचे त्यांनी युवतीला सांगितले. नोकरी न लागल्याने हताश झालेल्या युवती व तिच्या पालकांनी पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु पैसे परत न करता, पालकांना काही धनादेश दिले. परंतु खात्यात पैसे नसल्याने हे धनादेशसुद्धा रद्द झाले. मुलीच्या फसवणुकीची तक्रार त्यांनी नोंदविली असता, पोलिसांनी मे 2019 मध्ये हा गुन्हा दाखल केला होता.
बनावट नियुक्तिपत्र अनेकांना वाटली
विमान कंपन्यांकडे नोकरीचे आमिष दाखवून केवळ एकाच मुलीला फसविले नसून, अन्य काही लोकांकडून या त्रिकुटाने लाखो रुपये वसूल करून बनावट नियुक्तिपत्र वाटली असावी, त्याची पडताळणी पोलिस करतील, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com