आश्चर्यच की! सायकलसाठी चक्क सहा महिने ‘वेटिंग’

श्रीनाथ वानखडे
Saturday, 20 February 2021

इतरांच्या सायकली बाहेर दिसायला लागल्यावर ज्यांच्याकडे सायकली नाही त्यांनी नवीन सायकल खरेदी कडे मोर्चा वळविला. शिवाय काही शासकीय कार्यालयांनी सुद्धा कर्मचाऱ्यांनी एक दिवस सायकलने येण्याचा फतवा काढला.

मांजरखेड (जि. अमरावती) : ज्याप्रमाणे नाण्यांना दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रत्येक बाबीला दोन बाजू असतात. कुठली चांगली तर कुठली वाईट. कोरोनामुळे जगात सर्वच वाईट घडल असेही नाही. पर्यावरणातील प्रदूषण पातळीत झालेली घट व नाते-संबंधात झालेला सुधार ही कोरोनाच सकारात्मक देण. आज कोरोनामुळे अडगळीत पडलेल्या सायकलीला गतवैभव प्राप्त झाले आहे. काही सायकलसाठी चक्क सहा महिने वाट (वेटिंग) पहावी लागत असल्याचे शहरात पहायला मिळत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक जण बंदिस्त झाले. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे शाळा, कार्यालये घरीच भरायला लागली. एकाच जागेवर बसून अनेकांचे पोट सुटले. प्रकृती मेंटेन रहावी म्हणून डॉक्टरांनी अनेकांना सायकलिंग सल्ला दिला. बघता बघता अनेकांनी आपल्या सायकली बाहेर काढल्या.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

इतरांच्या सायकली बाहेर दिसायला लागल्यावर ज्यांच्याकडे सायकली नाही त्यांनी नवीन सायकल खरेदी कडे मोर्चा वळविला. शिवाय काही शासकीय कार्यालयांनी सुद्धा कर्मचाऱ्यांनी एक दिवस सायकलने येण्याचा फतवा काढला. त्यामुळे सकाळ व सायंकाळी रस्त्यांवर सायकलींची संख्या वाढायला लागली तर दुसरीकडे बाहेर देशातील आयात बंद असल्यामुळे होता तो माल संपुष्टात आला.

गीअर सायकलची मागणी

कोरोना काळात गीअर सायकलची मागणी वाढली आहे. या सायकलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर बाहेर देशातील आहे. गीअरच्या चांगल्या दर्जाच्या सायकली अल्युमिनियम धातूपासून बनते. शिवाय महागड्या सायकलचे टायर परदेशात बनत असल्याने सायकल उत्पादन घटल्याचे कुळकर्णी ऑटोमोबाईलचे संचालक आशुतोष कुळकर्णी यांनी सांगितले.

शाळा लागल्याने मागणी घटणार

हिरो, अटलास, हर्क्युलस या देशी तर राल्हे, कॉस्मिक, फँटम, फायरफॉक्स, अटीटो या परदेशी सायकल कंपन्या आहे. शाळा बंद असल्याने मुलांची सायकलची क्रेझ वाढली होती. उत्पादन कमी व मागणी जास्त शिवाय आयात बंद त्यामुळे काही कंपन्याच्या सायकलीची मागणी वाढली. आता शाळा सुरू झाल्याने मागणी कमी होत असल्याचे सायकल झोनचे संचालक ललित बाहेती यांनी सांगितले.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

इलेक्ट्रिक सायकलची क्रेझ

माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये दिवसभर शाळा, ट्युशन जाताना ट्राफिक पोलिसांचा होणारा अडसर बघता शालेय मुलांची मागणी इलेक्ट्रिक सायकलकडे वळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: six months waiting for the New cycle purchasing