esakal | गोंदिया : मारबत विसर्जनासाठी गेले अन् चार युवक पुरात वाहून गेले
sakal

बोलून बातमी शोधा

Three people were drowned while taking selfie in the bindusara lake

गोंदिया : मारबत विसर्जनासाठी गेले अन् चार युवक वाहून गेले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेले २४ तासांत विदर्भात सर्वदूर झालेल्या पावसाने नदीनाले दुथडी भरून वाहत आहे. विदर्भातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गोंदिया जिल्ह्यात चार, तर यवतमाळ जिल्ह्यात दोन तरुण असे सहा तरुण पुरात वाहून गेले.

गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार (ता. आमगाव) येथील बाघ नदीच्या पात्रात अंघोळीसाठी उतरलेले संतोष अशोक बहेकार (वय १९), रोहित नंदकिशोर बहेकार (वय १८), मयूर अशोक खोब्रागडे (वय २१) व सुमीत दिलीप शेंडे (वय १७, सर्व रा. कालीमाटी) हे चार युवक वाहून गेले. ही घटना मंगळवारी (ता. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली. त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, सायंकाळपर्यंत कोणाचाही शोध लागला नाही. कालीमाटी येथील सात युवक मुंडीपार येथील बाघनदीकडे मारबत विसर्जन करण्यासाठी गेले होते. मारबत विसर्जित झाल्यानंतर संतोष, रोहित, मयूर व सुमीत हे चौघे आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले व पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही वाहून गेले.

हेही वाचा: नागपुरात चर्चेनंतरच लॉकडाऊन; आपत्ती व्यवस्थापन समिती

यवतमाळ जिल्ह्यातील वसंतनगर (ता. दिग्रस) येथील काळी (दौ.)कडे जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना दुचाकी काढण्याच्या नादात दोन तरुण वाहून गेले. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर जाधव (वय २८) व सुरेश महिंद्रे (वय २७) असे वाहून गेलेल्या तरुणांची नावे असून, दोघेही साई इजारा (ता. महागाव) या गावचे रहिवासी आहेत.

काळी (दौ.) ते दिग्रस मार्गावरील वसंतनगर येथील पुलावरून पाणी वाहत होते. असे असताना ज्ञानेश्वर व सुरेशने पुलावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला; पुलाजवळ उभ्या असलेल्या नागरिकांनी दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी कुणाचेही ऐकले नाही व पुरात वाहून गेले. मंगळवारी (ता. ७) सकाळी ज्ञानेश्वर जाधव याचा मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडला. मात्र, सुरेश महिंद्रे याचा अद्याप शोध लागलेला नाही.

हेही वाचा: अमरावती : पांढुर्णा येथील गोटमारीत २५० जण जखमी

अकोल्यात एक तलावात बुडाला

अकोला जिल्ह्यात तलावात बुडाल्याने एकाचा मृत्यू झाला तर अतिवृष्टीने भिंत कोसळून एक जण ठार झाला. एरंडा (ता. बार्शीटाकळी) येथे सोमवारी झालेल्या पावसामुळे भिंत कोसळून श्यामराव आप्पा पवार (वय ७०) यांचा मृत्यू झाला तर खेलसटवाजी (ता. तेल्हारा) येथील येनुद्दीन फखरूद्दीन यांचा तलावात बुडून मृत्यू झाला.

loading image
go to top