हिंदी विश्‍व विद्यालयातील सहा विद्यार्थी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

वर्धा : कांशीराम यांचा परिनिर्वाणदिन साजरा करण्यासाठी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध घटनांबाबत पत्र देऊन निदर्शने करीत विरोध दर्शविला. त्यामुळे आचारसंहिता आणि न्यायालयीन प्रक्रियेचा भंग केल्याच्या कारणावरून हिंदी विश्‍व विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी अखिल भारतीय दलित लेखिका मंचतर्फे पत्रकार परिषद घेऊन हिंदी विश्‍वविद्यालय प्रशासनाचा आज, शुक्रवारी निषेध केला.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍व विद्यालय प्रशासनाने कांशीराम यांचा परिनिर्वाणदिन साजरा करावा, अशी पत्राद्वारे मागणी केली होती. देशातील दलित, अल्पसंख्यकांचे मॉबलिंचिंग तसेच हिंसा व अत्याचार, काश्‍मीर प्रश्‍न, याशिवाय रेल्वे, बीएसएनएलचे होत असलेले खासगीकरण तसेच लेखकांवर बिहारसह इतर राज्यांतील न्यायालयांत देशद्रोहाचे खटले भरण्यात आले. या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. यासाठी हिंदी विश्‍वविद्यालय परिसरात सामूहिक धरणे देणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना विश्‍वविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे. यात चंदन सरोज, रजनीश कुमार आंबेडकर, वैभव पिंपळकर, राजेश सारथी, नीरज कुमार आणि पंकज बेला या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
नऊ ऑक्‍टोबर रोजी विद्यार्थी कुलगुरूंच्या कक्षात कांशीराम यांचा परिनिर्वाणदिन साजरा करण्यासाठी परवानगी मागण्यासाठी गेले होते. परंतु, कुलसचिवांनी परवानगी दिली नाही. सात ऑक्‍टोबरला देशातील घडामोडींबाबत पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचे लक्ष वेधले होते. परंतु, प्रशासनाने परिपत्रक काढून विश्‍वविद्यालय परिसरात विनापरवाना कोणताही कार्यक्रम करण्यात येणार नसल्याचे म्हणत कारवाईचा इशारा दिला होता. या पत्रामध्ये निवडणूक आचारसंहितेचा कोणताही उल्लेख केला नव्हता, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. निलंबित केलेल्या विद्यार्थ्यांवरील निलंबनाची कारवाई विश्‍वविद्यालय प्रशासनाने त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय दलित लेखिका मंचतर्फे करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six students of Hindi University suspended