दीड कोटींचा तूर घोटाळा करून तो झाला होता फरार...मग घडले असे

file photo
file photo

यवतमाळ : रंजित रामराव राठोड (रा. तोरणाळा, ता. दारव्हा) याने शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी केली होती. त्यानंतर ती तूर त्याने नाफेडला जास्त भावात विकली. यामुळे शासनाची 1 कोटी 41 लाख 82 हजार 863 रुपयांची फसवणूक करण्यात आली.

अखेर या विरुद्ध प्रभारी मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दारव्हा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या तपासाची सूत्रे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांच्याकडे आली.

पाच जणांना केली अटक

त्यानंतर पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत यांनी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक हरिभाऊ गुल्हाने (रा. दारव्हा), धनराज शंकर मळसे (वय 53, रा. शेलोडी), अमिन भाहुद्दीन मलनस (रा. वडगाव गाढवे), धर्मेंद्र देवराव ढोले (रा. नाथुवाडी), महेश पंजाब भोयर (रा. शेलोडी) या पाच जणांना अटक केली होती.

मुख्य आरोपीला बुधवारी अटक

या प्रकरणातील आरोपी रंजित राठोड गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. 2018 मध्ये दारव्हा येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी त्याने केलेला अर्ज अखेर नामंजूर करण्यात आला होता. अखेर शोध घेऊन त्याला बुधवारी (ता. 4) अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्ष राहुलकुमार राऊत यांनी ही कारवाई केली. त्यामुळे या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com