ऐन वर्गात स्लॅबचा पापुद्रा कोसळला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

काटोल (जि. नागपूर) : जि. प. प्राथमिक शाळा पांढरढाकणी येथील शाळेचा वर्गातील स्लॅबचा पापुद्रा गुरुवारी (ता. 25) अचानक खाली कोसळल्याने विद्यार्थ्यांची पळापळ झाली. या स्लॅबचा मोठा भाग कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकरी, पालक, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अशी जीवघेणी परिस्थिती असताना जिल्हा परिषद प्रशासन मुलांच्या जिवाशी खेळत असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्‍त केली.

मागील पाच वर्षांत सहावेळा इमारत दुरुस्तीचे प्रस्ताव शाळा व्यवस्थापन समितीने दिलेले आहेत. मात्र कोणतीही कार्यवाही करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून जि. प. कडे नवीन इमारतीकरिता विविध प्रकारचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी केंद्रप्रमुख योगेश चरडे व विस्तार अधिकारी संतोष सोनटक्‍के यांना पांढरढाकणी येथे तत्काळ पाठविले. त्यांनी सरपंच प्रदीप मसराम व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा करून पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतच्या नवीन इमारतीमध्ये बसण्याची तात्पुरती सोय केली. जि. प. मुख्याधिकारी यांची सरपंच, ग्रामस्थ, पालक भेट घेऊन ही गंभीर बाब लक्षात आणून देणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The slab collapsed