सेक्स रॅकेटसाठी मोटारीत करण्यात आली 'ती' व्यवस्था

अनिल कांबळे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर: हॉटेल्स आणि पॉश इमारतीत सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घातले. मात्र, पहिल्यांदाच कारमध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर पोलिसांनी छापे घालून एका विद्यार्थिनीला ताब्यात घेतले तर दोन दलाल युवकांना अटक केली. विशेष म्हणजे सेक्स रॅकेटसाठी मोटारीच्या सिट्स काढून छोटा बेड बसवण्यात आला होता. ही कारवाई झोन पाचच्या पथकाने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास जरीपटक्‍यात केली. योगेश शाहू (वय 23, रा. इंदिरा गांधी नगर) आणि राहुल अनिल गवतेल (वय 21, रा. ठक्‍करग्राम, पाचपावली) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांनी शहरातील सेक्‍स रॅकेटवर छापेमारी सुरू करताच अन्य पोलिस उपायुक्‍तांनीही परिसरातील देहव्यापाराच्या अड्ड्यावर छापे घालण्यास सुरूवात केली. झोन पाचचे उपायुक्‍त हर्ष पोद्‌दार यांच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्‍के यांना जरीपटक्‍यातील दिपक नगर विटाभट्‌टी परिसरात एका कारमध्ये सेक्‍स रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास सोनटक्‍के यांनी सापळा रचला. पंटर पाठवून योगेश आणि राहूलची भेट घेतली. त्यांना आंबटशौकीन असल्याचे सांगून मुलीची मागणी केली. दोघांनी 3 हजार रूपयांत सौदा केला. त्यानंतर अंधारात उभ्या असलेल्या(क्र.एमएच 31-ईक्‍यू 0271) अलिशान कारमध्ये पाठवले. त्या कारमध्ये पाच मिनीटाच एक 20 वर्षाची तरूणी आली. तिने लगेच कारचा दरवाजा बंद केला. काही वेळातच पोलिसांनी छापा घातला आणि मुलीला ताब्यात घेतले. दोन्ही दलालांनाही अटक केली.

दलालांची नवीन शक्‍कल
शहरातील हॉटेल्स, लॉज आणि ब्युटी पार्लरवर पोलिस उपायुक्‍त कदम यांच्या छापेमारीमुळे सेक्‍स रॅकेटमधील दलाल त्रस्त झाले. त्यामुळे एका ठिकाणी देहव्यापार केल्यास छाप्याची भीती होती. त्यामुळे दलालांनी नवीन शक्‍कल शोधली. काळ्या फिल्म असलेल्या कारमधील सिट्‌स काढून छोटासा बेड बसवून सेक्‍स रॅकेट चालविणे सुरू केले. या शक्‍कलमुळे पोलिसही अचंभीत झाले.

Web Title: Small bed in car for sex racket at nagpur