अधिकाऱ्यांमुळे खुंटला लघुउद्योगांचा विकास

नागपूर : प्रभु कुमार गुप्ता यांना लघुउद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना कृष्णा गोपाल यांच्यासह अर्जुन मेघवाल, अजित सिंह, जितेंद्र गुप्त, गोविंद लेले व रवींद्र वैद्य.
नागपूर : प्रभु कुमार गुप्ता यांना लघुउद्योग क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करताना कृष्णा गोपाल यांच्यासह अर्जुन मेघवाल, अजित सिंह, जितेंद्र गुप्त, गोविंद लेले व रवींद्र वैद्य.

नागपूर : शंभरपैकी एखादाच अधिकारी चांगला असतो. उर्वरित अधिकारी फाइल मार्गी लावण्याऐवजी ती कशी रोखता येईल, नियमांची भक्कम फौज त्याभोवती कशी लावता येईल याचाच विचार करतात. याच नकारात्मकतेने लघुउद्योगांचा विकास खुंटल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपाल यांनी व्यक्‍त केले.
लघुउद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित राष्ट्रीय अधिवेशनाअंतर्गत उद्योगी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. मंचावर अवजड उद्योगमंत्री अर्जुन मेघवाल, प्रसिद्ध उद्योजक अजित सिंह, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष जितेंद्र गुप्त, सचिव गोविंद लेले, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र वैद्य उपस्थित होते. जागतिक व्यापार वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या कक्षेत आला. त्यामुळे सर्व राष्ट्रांनी त्यांचे नियम पाळायला हवे. मात्र, अर्धे राष्ट्र
डब्ल्यूटीओ नियमच पाळत नाही. चीन यात अग्रेसर आहे. कुठले पेटंट असलेल्या उत्पादनाचे बनावट करण्यात चीन समोर असतो. वल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नियमावलीमुळे भारतीय उद्योग धोक्‍यात आहे. ई कॉमर्स व्यवसायाचा मोठा फटका भारतीय उद्योगाला बसत असून, लघुउद्योगांचे खेळते भांडवल ई कॉमर्स क्षेत्रात अडकत आहे. केंद्र सरकारने या क्षेत्रासाठी स्वतंत्र तरतूद करावी व लघुउद्योगातील खेळत्या भांडवलास घोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. गोपाल यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com