

Amravati Police Officer Suffers Snake Bite Inside Station Premises
sakal
अमरावती : शहरातील गाडगेनगर पोलिस ठाण्यामध्ये कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यास खोलीत शिरलेल्या सापाने दंश केल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रेमलता वाघाडे, असे महिला पोलिस शिपायाचे नाव आहे. शनिवारी (ता. २१) त्यांची रात्रपाळीत ड्यूटी होती.