वडगाव-गुजर येथे घरी, दारी साप

Snake
Snake

गुमगाव - साप, नाग, घोणस, तस्कर, मण्यार ही नावे ऐकली तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. काही लोक तर भीतीपोटी बेशुद्ध होतात. घरात साप आहे, हा विचारही लोकांना झोपू देत नाही. परंतु, या सरपटणाऱ्या प्राण्याचा सध्या हिंगणा तालुक्‍यातील वडगाव-गुजर या छोट्याशा गावात धुमाकूळ सुरू आहे. गावात घरात साप, दारात साप, शेतात साप, गोठ्यात साप, शाळेत, विहिरीत साप असे महिन्यातून सरासरी चाळीस ते पन्नास साप हमखास दिसतात. गावात जेवढी लोकसंख्या आहे त्यापेक्षा अधिक साप परिसरात आढळले. 

हिंगणा तालुक्‍यातील ५०० ते ६०० लोकसंख्या असलेले छोटे गाव म्हणजे वडगाव-गुजर. गावातील अनेकांनी शेती विकून शहर गाठले. तरुणही रोजगारासाठी शहर गाठत असल्याने  दिवसेंदिवस लोकसंख्या कमी होत आहे. 

शेती हा मुख्य व्यवसाय असून, गावाच्या चारही  बाजूला शेती, जंगल तसेच गावाला तिन्ही बाजूने नाल्याचा वेढा आहे. 

जंगलालगत मानवी वस्ती असल्याने गावातील घरात, शेतात, गोठ्यात सापाचे दर्शन होते. दिवसाआड येथे दोन-तीन साप दिसतातच. अनेकवेळा सापांना मारले जाते. कधीकधी सर्पमित्रांना पाचारण केले जाते. परंतु, ते पोहोचायच्या आत साप निघून गेलेला असतो. 

गावातील (टोली) नवीन वस्तीत साप निघण्याचे प्रमाण जास्त असल्याचे गावकरी सांगतात. गावातील अनेकांचा मृत्यू सर्पदंशाने झालेला असून, काही शेतकऱ्यांकडील बकरी, गाय अन्‌ बैलसुद्धा सर्पदंशाने गतप्राण झाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशी गावातील जिल्हा परिषद शाळेत निघालेल्या सापाने अक्षरशः नाकीनऊ आणलेले होते. दररोज वेगवेगळे साप दिसत असल्याने नागरिकांमध्ये आश्‍चर्य आहे. 

चोहीकडे शेती न जंगल
गावाच्या चारही बाजूने शेती आणि जंगल असून नालाही आहे. गावात स्वच्छतेचा अभाव असल्याने सापांचे प्रमाण वाढत असल्याचे शफी महम्मद शेख, गजानन नान्हे, अमित सुरस्कर, शाबुद्दीन काले खान, संदीप सुरस्कर, अनिकेत लोडे आणि जगदीश भोंग सांगतात.

साप आपला १०० मीटरचा परिसर सोडून कधीच जात नाही. तो त्याच परिसरात फिरत असतो. गावातील वेगवेगळ्या लोकांना एकच साप दिसला तरी तो साप वेगळाच होता, असे प्रत्येक जण सांगतात. साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्याचा बळी न घेता सर्पमित्रांना पाचारण करा. 
- पराग वानखेडे, प्रमुख पीपल्स ग्रुप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com