रेल्वे बोगीत साप, महाराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये खळबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

नागपूर  : कोल्हापूर - गोंदिया महाराष्ट्र एक्‍स्प्रेसच्या जनरल डब्यात चक्क साप आढळून आल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. एका खिडकीजवळील प्लायवूडमध्ये असलेल्या फटीतून साप आत शिरला. यामुळे प्रवाशांनी अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास केला. गुरुवारी सायंकाळी ही गाडी नागपूर स्थानकावर आल्यानंतर सापाचा शोध घेण्यात आला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. उपाययोजनेनंतर ही गाडी पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आली.

गोंदियाकडे निघालेली महाराष्ट्र एक्‍स्प्रेस वर्धा स्थानकाजवळ असताना जनरल डब्यातील प्रवासी शंकर लोपेंटी यांना सामान ठेवण्यासाठी असलेल्या सज्जावरील बॅगवर साप दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर डब्यातील प्रवासी घाबरले. थोड्याच वेळात साप एका खिडकीजवळील प्लायवूडमध्ये असणाऱ्या फटीतून आत शिरला. काही वेळातच ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 4 वर पोहोचली. महाराष्ट्र एक्‍स्प्रेसमध्ये साप निघाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. लगेच स्टेशन संचालक दिनेश नागदेवे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले.

Web Title: sneak in railway