स्नेहल घाडगे दहावीत जिल्ह्यातून अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 जून 2018

दहावीच्या परीक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवित फ्री मेथॅडिस्ट इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी स्नेहल घाडगे जिल्ह्यातून प्रथम आली आहे.

यवतमाळ : दहावीच्या परीक्षेत 99. 60 टक्के गुण मिळवित फ्री मेथॅडिस्ट इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी स्नेहल घाडगे जिल्ह्यातून प्रथम आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता. आठ) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात येथील आनंदनगरमधील रहिवासी मनोज घाडगे व सविता घाडगे यांची मुलगी स्नेहल ही 99. 60 टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून अव्वल आली आहे.

आपल्या मुलीने जिल्ह्यातून पहिला क्रमांक पटकाविल्याचा आनंद त्यांनी स्नेहलला पेढे भरवून व्यक्त केला. स्नेहलला चित्रकलेची आवड असून तिने संगीतात प्रावीण्य प्राप्त केले आहे. तसेच ती बॅडमिंटनची राज्यस्तरीय खेळाडू आहे. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असून तिला न्यूरॉलॉजिस्ट व्हायचे असल्याचे तिने सांगितले.

Web Title: snehal ghadge frist in 10th in to yavatmal district