सामाजिक न्यायमंत्री सुपरमध्ये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

नागपूर - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी (ता.22) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टीएमटी चाचणी केली. दुपारी साडेबारा वाजता कॅथलॅबमध्ये तपासणीसाठी आल्यानंतर सामान्यांप्रमाणे त्यांनी उपचार घेतले.

नागपूर - राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी (ता.22) सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये टीएमटी चाचणी केली. दुपारी साडेबारा वाजता कॅथलॅबमध्ये तपासणीसाठी आल्यानंतर सामान्यांप्रमाणे त्यांनी उपचार घेतले.

टीएमटी कक्षात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुनील वाशीमकर यांनी त्यांना तपासले. विशेष म्हणजे, तब्बल 22 मिनिटे त्यांची टीएमटी चाचणी घेण्यात आली. रक्तदाब व इतरही चाचण्या करण्यात आल्या. गतवर्षीदेखील त्यांनी सुपरमध्ये तपासणी केली होती. अलीकडे शासकीय रुग्णालयांकडे व्हीआयपी, व्हीव्हीआयपी तसेच इतर प्रतिष्ठितांनी पाठ फिरवली आहे. सरकारी रुग्णालये गरिबांची असतात, हा समज जनमानसात आहे. मंत्री काय साधे नगरसेवकही उपचारासाठी शासकीय रुग्णालयात येत नाहीत. दोन वर्षांपूर्वी अधिवेशन काळात आमदार रवींद्र चव्हाण सुपरमध्ये उपचारासाठी आले होते. त्यांच्यावर योग्य उपचार झाले. परंतु, सामाजिक न्यायमंत्री बडोले सातत्याने सुपरमध्ये तपासणीसाठी येतात. येथील हृदयरोग विभागप्रमुख डॉ. मुकुंद देशपांडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ. वाशीमकर यांच्यासह परिचारिकांशी बडोले यांनी संवाद साधला.

सोयी-सुविधांबाबत विचारपूस
सुपर स्पेशालिटीत टीएमटी चाचणीनंतर बाह्यरुग्ण विभागाकडून जात असताना बडोले यांनी येथील सोयी-सुविधांची माहिती जाणून घेतली. हृदय व गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात डीएम अभ्यासक्रम सुरू केल्याने अधिक वाव असल्याचे विशेषकार्य अधिकारी डॉ. श्रीगिरीवार यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सर्वांची मेहेरनजर मेडिकल आणि सुपरवर असल्याचे बाब निर्दशनास आणून देत मदतीचे आश्‍वासन बडोले यांनी दिले.

Web Title: Social Justice in the super