वणीतील वृद्ध खातो अर्धाकिलो माती !

तुषार अतकारे
शनिवार, 7 एप्रिल 2018

वणी (जि. यवतमाळ)  : या जगात अनेक व्यक्ती त्यांच्या सवयीमुळे, त्यांच्यातील विविध गुणांमुळे, वैशिष्ट्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. अशा व्यक्तिंमध्ये जन्मजात काही वैशिष्ट्ये असतात; तर काहींमध्ये परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या सवयी असतात. सध्या वणी येथे राहणारे, पण मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागाळा येथील रमेश लटारी बाविस्कर (वय 60) मागील 45 वर्षांपासून माती खात असल्याची बाब प्रकाशात आली. हे कुणाला सांगितले तर विश्‍वास बसणार नाही परंतु, ते सत्य आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात नागाळा येथे अगदी लहान असताना रमेश बावीस्कर नदीकाठी गुरे चारण्यासाठी जात असे. तेव्हा नदीकाठी असलेली गाळाची माती एक दिवस लहान रमेशने चाखून पाहिली. त्याला त्या मातीची चव आवडली. दुसऱ्या दिवशीही त्याने माती चाखून पाहिली. त्याला त्या मातीची सवयच जडली. त्या दिवसापासून तो दररोज नदीकाठावरील गाळाची माती न चुकता खाऊ लागला. ही सवय त्याचा नित्यक्रम बनली. सुरवातीला थोडी थोडी माती खाणारा रमेश नंतर रोज अर्धाकिलोपर्यंत माती खाऊ लागला. या त्याच्या सवयीमुळे त्याच्या प्रकृतीवर कोणताही दुष्परिणाम झाला नाही. आतापर्यंत त्याला कोणताही आजार जडला नाही. मात्र, थोडी फार विचित्र वाटणारी त्याची ही सवय त्याच्या जीवनातील अविभाज्य घटक बसली. रोजगाराच्या शोधत अनेक वर्षांपूर्वी तो वणी येथे आला. पण त्याच्या माती खाण्याच्या सवयीमुळे त्याने गावावरून पोत्याने माती भरून आणून खायला सुरवात केली. मध्यंतरी कामाच्या व्यापामुळे त्याला गावाला जाऊन माती आणणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला होता. अशात एक दिवस त्याने तो ज्या कोळशाच्या प्लॅंटवर काम करायचा तेथील कोळशातील मातीचा एक खडा उचलून सहज खाऊन पहिला, त्याला त्याची चवही चांगली वाटली. पण, कोळशाचा खडा खाल्ल्याने काही अपाय होईल काय, या भीतीने त्याने काही दिवस कोळशातील खडे खाऊन पाहिले. त्याला कोणताही अपाय किंवा त्रास झाला नाही. त्यामुळे त्याने आता कोळशामध्ये जे मातीचे खडे येतात ते खाणे सुरू केले आहे. त्याला कोणत्याही गावाला जायचे असेल किंवा तिकडे मुक्काम करायचा असेल, तर हा रमेश कपडे व इतर सामनासोबत पुरेल इतके मातीचे खडे घेऊन जातो. एक दिवसासाठी जायचे असेल तर खडे पॅन्टच्या खिशातच टाकून कुणालाही न भीता तो सर्वांसमक्ष माती खात असतो. अशा प्रकारे या रमेशला जगावेगळी सवय लागली आहे. ही माती खात असताना तो नियमित जेवणसुद्धा करतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे.

Web Title: Soil eater old man news

टॅग्स