शहर व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडी व उद्योजक मोर्चा नागपूर शहरतर्फे विविध असोसिएशन्सच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.  या वेळी आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, गिरीश व्यास, सुधाकर देशमुख, अनिल सोले, मिलिंद माने, विकास कुंभारे व परिणय फुके होते. मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.

धानावर सेस लावल्यानंतर पुन्हा त्यापासून निघणाऱ्या कनकीवर महाराष्ट्रात सेस लावण्यात येतो. त्यामुळे महागाई वाढत असून, ग्राहकांचा खिसा हलका होत आहे. यामुळे कनकीवरील सेस रद्द करावा या मागणीचे निवेदन होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्‌स मर्चंटचे अध्यक्ष संतोष अग्रवाल, सचिव प्रताप मोटवानी, राइस ॲण्ड ग्रेन ब्रोकर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शनिवारे यांनी संयुक्तरीत्या दिले.

नागपूर चिलीज मर्चट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद गर्ग व सचिव संजय वाधवानी यांनी लाल मिरची जीवनावश्‍यक वस्तू असल्याने त्याला जीएसटीतून मुक्तता करावी. कळमना बाजारातील विजेचे दर कमी करावेत. धान्य, मिरची, आलू, कांदे मार्केटमध्ये सर्वच असोसिएशनतर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीने ९०० पेक्षा अधिक दुकाने १९८६ पासून विक्रीपत्र केलेले नाहीत. सर्वच व्यापाऱ्यांना येथील गाळ्यांचे विक्रीपत्र करून  द्यावे. सेसचे दरही कमी करावेत. ऑरो चिल्ड वाटर सप्लाई असोसिएशनचे अध्यक्ष विमल अग्रवाल, प्रशांत दहीकर यांनीही त्यांच्या असोसिएशनच्या सदस्यांना व्यवसायाचा परवाना द्यावा अशा मागणीचे निवेदन दिले.

Web Title: Solve City Merchant Issues