हिस्सेवाटणीवरून मुलाने केला जन्मदात्याचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

झरी (जि. यवतमाळ) : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून पोटच्या मुलानेच बापाचा निर्घृण खून केला. झरी तालुक्‍यातील पाटण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खापरी येथे गुरुवारी (ता.25) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी थोरल्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे.

झरी (जि. यवतमाळ) : शेतीच्या हिस्सेवाटणीवरून पोटच्या मुलानेच बापाचा निर्घृण खून केला. झरी तालुक्‍यातील पाटण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खापरी येथे गुरुवारी (ता.25) सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी थोरल्या मुलाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मुलाला अटक केली आहे.
नामदेव दत्तू उरवते (वय 32) असे संशयिताचे, तर दत्तू उरवते असे (वय 70) दुर्दैवी पित्याचे नाव आहे. दत्तू उरवते यांना नामदेव आणि पंजाब अशी दोन मुले आहेत. लहान मुलगा नामदेव हा कोणताही कामधंदा करीत नाही. तो आदिलाबाद जिल्ह्यातील जामणी येथील सासुरवाडीला राहतो. 22 जुलैपासून तो खापरी येथील मोठा भाऊ पंजाबकडे येऊन राहू लागला.
गुरुवारी रात्री नामदेवने वडिलांसोबत जेवण केले. त्यानंतर आईवडील त्यांच्या खोलीत तर नामदेव हा जुन्या घरात जाऊन झोपला. मोठा मुलगा पंजाब हा शेतात जागलीला गेला होता. मध्यरात्रीनंतर दोन ते तीनदरम्यान नामदेव वडिलांच्या खोलीत शिरला. झोपलेल्या वडिलांच्या डोक्‍यावर वेळवाच्या काठीने जबर मारहाण सुरू केली. आई व पंजाबची पत्नी संगीता सोडविण्यासाठी गेल्या असता त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे संगीताने शेतात जाऊन पतीला ही घटना सांगितली. पंजाब उरवते घरी पोहोचला असता त्याला वडील खाटेवर मृतावस्थेत पडून दिसले.
पंजाब उरवते यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाटण पोलिसांनी संशयित नामदेव उरवते याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
मेंदू कुत्र्याला टाकल्याची चर्चा
गुरुवारी रात्री नामदेव याने क्रूरतेची सीमा गाठत वडिलांना जिवानिशी ठार मारले. त्यानंतर कवटीतून बाहेर पडलेला मेंदू चक्क कुत्र्याला खाऊ घातला. या घटनेची चर्चा परिसरातील गावांमध्ये दिवसभर सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son murdered father for property