esakal | ‘मला अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही’ असे वडिलांनी विचारल्याने चिडलेल्या मुलाने केला खून
sakal

बोलून बातमी शोधा

Son murders father in domestic dispute Gadchiroli crime news

चिडलेल्या अक्षयने वडिलांच्या हातातून बरची हिसकावून मागून पकडून त्याच बरचीने गळा चिरून खून केला. याप्रकरणी आरोपीचा भाऊ सागर मनिराम पदा याच्या तक्रारीवरून धानोरा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

‘मला अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही’ असे वडिलांनी विचारल्याने चिडलेल्या मुलाने केला खून

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धानोरा (जि. गडचिरोली) : अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही, असे म्हणून भांडण करीत मुलावर शस्त्राने वार करणाऱ्या वडिलांचा मुलाने त्याच शस्त्राने गळा कापून खून केला. ही घटना शनिवार (ता. २०) रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास धानोरा तालुक्‍यातील लेखाटोला येथे घडली. मृताचे नाव मनिराम बाजू पदा (वय ५३) असून, आरोपीचे नाव अक्षय मनिराम पदा (वय २२) आहे.

प्राप्त माहितीनुसार, वडील मनिराम पदा याने मुलगा अक्षय पदा याला ‘मला कोंदावाही येथे अंत्ययात्रेला का जाऊ दिले नाही’, असे विचारत भांडण केले. वाद वाढत असताना मनिरामने लोखंडी बरचीने मुलगा अक्षय याच्या पोटावर वार केला. यात तो जखमी झाला.

अधिक वाचा - महापालिकेवर तुकाराम मुंढेचे वर्चस्व कायम! सत्ताधाऱ्यांमध्ये अद्यापही संताप, नव्या आयुक्तांकडून निर्णयाची अंमलबजावणी

चिडलेल्या अक्षयने वडिलांच्या हातातून बरची हिसकावून मागून पकडून त्याच बरचीने गळा चिरून खून केला. याप्रकरणी आरोपीचा भाऊ सागर मनिराम पदा याच्या तक्रारीवरून धानोरा पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

कोच्छी येथे युवकाची आत्महत्या

मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत उडी घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील कोच्छी/दांडेगाव येथे घडली. मृताचे नाव राजकुमार मनोहर सेलोटे (वय ३३) असे आहे. गावातील ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या विहिरीत शनिवारी मध्यरात्री राजकुमारने उडी घेतली होती. याबाबत लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

जाणून घ्या - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर काळाचा घाला

चांदपूरच्या कालव्यात मृतदेह आढळला

भंडारा जिल्ह्यातील चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात रविवारी सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृताचे नाव प्रकाश कटरे (वय ५०) असून तो चिचोली/बघेडा येथील रहिवासी आहे. चांदपूर जलाशयाच्या कालव्यातून सिंचनासाठी पाणी वितरित करणे सुरू आहे. प्रकाश कटरे हा घरून आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तुमसर पोलिसांनी दाखल केली आहे. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना रविवारी सकाळी चांदपूर जलाशयाच्या मुख्य कालव्यात मृतदेह तरंगताना दिसला.