वडिलांचा खून करून रात्रभर तिथेच झोपला; अखेर पोलिसांसमोर फुटले बिंग 

संतोष ताकपिरे
Thursday, 15 October 2020

दारू पिऊन घरी आलेल्या मुलाला हटकल्याने त्याने वडिलांचा खून केला व रात्रभर तो त्यांच्या मृतदेहाजवळ झोपल्याची घटना गुरुवारी (ता. 15) भिलोना या गावात उघडकीस आली. बाळकृष्ण रमेश मालवे (वय 25), असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

पथ्रोट (जि. अमरावती):  जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. दररोज गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत, अशीच एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट इथे घडली आहे. मुलाने बापाचा खून करून एक अख्खी रात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहासोबत झोपून काढली आहे. 

दारू पिऊन घरी आलेल्या मुलाला हटकल्याने त्याने वडिलांचा खून केला व रात्रभर तो त्यांच्या मृतदेहाजवळ झोपल्याची घटना गुरुवारी (ता. 15) भिलोना या गावात उघडकीस आली. बाळकृष्ण रमेश मालवे (वय 25), असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

रमेश मालवे हे गृहस्थ पत्नी व एका मुलासह तर त्यांचा दुसरा मुलगा पत्नीसह बाजूलाच वेगळा राहतो. बुधवारी (ता. 14) रमेश मालवे यांनी सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्य आणून घरी ठेवले होते. त्यांच्या गैरहजेरीमध्ये मुलगा बाळकृष्ण व्यसन पूर्ण करण्याकरिता ते धान्य विकून दारू पिऊन घरी आला, याची माहिती वडिलांना समजताच त्यांनी त्याला हटकले. 

त्याने रागाच्या भरात लाकडी झिल्पीच्या साह्याने त्यांचा खून केला, एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याठिकाणी रात्रभर झोपला. आज सकाळी मोठ्या भावाला वडील घराच्या बाहेर दिसून न आल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले असता वडील रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. 

ठळक बातमी - मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता त्याला लहान भाऊ त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच झोपलेला दिसून आला. सुरुवातीला त्याने काहीच माहिती नसल्याचे सांगितले, त्यानंतर सदर प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर त्याचे बिंग फुटले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Son took extreme step as father misbehaved with him