मुख्यमंत्री येताच शेतकरी नेते स्थानबद्ध 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचे नियोजन करीत असताना रामदासपेठ पोलिसांनी शेतकरी जागर मंचचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्याच्या घरातून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (ता. 3) अकोला दौऱ्यावर आले. या पार्श्‍वभूमीवर सकाळी नऊ वाजताच येथील शेतकरी संघटनेचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्यांच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले व रामदासपेठ आणि सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केले आहे. 

परतीच्या पावसाने शेत पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी मुख्यमंत्री रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्ह्यातील विविध गाव-शिवाराला त्यांनी भेटी दिल्या. या घटनेसंदर्भात व शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचे नियोजन करीत असताना रामदासपेठ पोलिसांनी शेतकरी जागर मंचचे समन्वयक कृष्णा अंधारे व मनोज तायडे यांना त्याच्या घरातून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात स्थानबद्ध केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As soon as the Chief Minister arrives, the peasant leaders are arrested