मतदान आटोपले,अधिकाऱ्यांनी दारू ढोसली

टेकाडी ः दारूच्या नशेत तर्रर्र झालेले निवडणूक अधिकारी.
टेकाडी ः दारूच्या नशेत तर्रर्र झालेले निवडणूक अधिकारी.

टेकाडी  (जि.नागपूर) : मतदान आटोपल्यावर मतदान केंद्राच्या आवारात ईव्हीएम वाहनात खुलेआम सोडून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या खोलीतच दारू ढोसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दारू पित असताना फक्त एका होमगार्डला वाहनाजवळ ठेवण्यात आहे. कॉंग्रेसचे उमेदवार उदयसिंग यादव यांनी हा प्रकार निदर्शनास आणला आणि पारदर्शकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. 
रामटेक मतदारसंघातील कन्हान स्थित विकास हायस्कूल येथे येथील केंद्रातील मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रावरून ईव्हीएम गेल्या नसल्याची माहिती कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ उमेदवार उदयसिंग यादव आणि कॉंग्रेस कमिटी ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे यांनी कार्यकर्त्यांसह केंद्रावर धाव घेतली. निवडणूक अधिकारी विनायक झोडापे आणि इतर कर्मचारी दारूच्या नशेत तर्र आढळले. शाळेच्या प्रांगणात स्कॉर्पिओमध्ये (एमएच40 केआर 8111) चार ईव्हीएम बेवारस होत्या. बर्वे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता त्यांनी अरेरावी केली. त्यानंतर परिसरात गोंधळ उडाला. एसडीओ जोगेंद्र कट्यारे यांना फोनद्वारे तक्रार कळविण्यात आली. पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मध्यस्थी करून वाद शांत केला. उदयसिंग यादव यांनी ईव्हीएमचे "सील' तपासत सात वाजता मतदानप्रक्रिया संपल्यानंतर इतक्‍या उशिरा केंद्रखोलीच्या बाहेर प्रांगणात मशीन का ठेवण्यात आल्या, असा प्रश्न उपस्थित केला. महामार्गावर उभ्या असलेल्या एसटीमध्ये रात्री अकरा वाजता ईव्हीएम पाठविण्यात आल्या. सुरक्षेसंदर्भात कन्हान पोलिसांवर नागरिकांनी संशय व्यक्‍त केला आहे. शरद वाटकर, सतीश भसारकर, गौतम नितनवरे, शक्‍ती पात्रे, मोहसिन खान, मनीष भिवगडे व कॉंग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 
मतदान प्रक्रियेनंतर चार सेक्‍टरमधील ईव्हीएम आणि अधिकाऱ्यांना गोळा करण्याचे काम बसने सुरू होते. बस प्रत्येक केंद्रावर पोचत नसल्याची बसचालकांची तक्रार होती. त्यामुळे चारचाकी गाडीने ईव्हीएम बसपर्यंत आणण्याचे काम सुरू होते. त्यामुळे उशीर झाला. सुरक्षेसंदर्भात होमगार्ड ईव्हीएमजवळ होते. बीएसएफफ स्टोर रूमला एसीपींच्या आदेशाने पाठविण्यात आले. इतर केंद्रावर सुरक्षा व्यवस्था सुरू होती. शेवटच्या सेक्‍टरपर्यंत आमची जबाबदारी असते. त्यामुळे प्रश्नचिन्ह उभे करण्याचे कारण नाही. 
-चंद्रकांत काळे, कन्हान पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com