अरेरे काम संपताच कोव्हिड योद्ध्यांची गच्छंती, ७५ जणांना दाखवला बाहेरचा रस्ता 

as soon as the work was over, Kovid warriors reduction from work
as soon as the work was over, Kovid warriors reduction from work

अमरावती  ः कोविड महामारीचा प्रकोप सुरू झाल्यानंतर आपल्या जिवाची पर्वा न करता सुपर स्पेशालिटीमध्ये सेवा देणाऱ्या कंत्राटी कोविड योद्धांची अचानकपणे हकालपट्टी करण्यात आली आहे. आतापर्यंत ७५ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दुसरीकडे नव्याने १२५ कर्मचाऱ्यांची भरती केल्यामुळे कामावरून कमी करण्यात आलेल्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. 

कोविड महामारी सुरू झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरातच कैद झाले असताना प्रत्यक्षात मरणाच्या दारी जाऊन या कोविड योद्धांनी सेवा देण्यास सुरुवात केली. सुपर स्पेशालिटीच्या कोविड सेंटरमध्ये स्वच्छता कर्मचारी, टेलिफोन ऑपरेटर, लिफ्ट ऑपरेटर तसेच अटेडंन्ट या हंगामी पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोविड काळातही या कर्मचाऱ्यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता कोविड रग्णांना रुग्णवाहिकेमधून वॉर्डात भरती करणे, कोविडमुळे मृत पावलेल्यांचे प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह रुग्णवाहिकेत टाकणे, रुग्णांना लिफ्टमधून उपचारासाठी नेणे अशाप्रकारची जोखमीची कामे केली. 

आज ना उद्या आपला विचार होईल, या आशेने ही मंडळी काम करीत राहिली. मात्र अचानकपणे मुंबईतील एका कंपनीमार्फत राबविण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेत १२५ नवीन लोकांना नियुक्‍त्या देण्यात आल्याने जुन्या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. लोकप्रतिनिधींपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी त्यांना निश्‍चिंत राहण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात पाच डिसेंबरला जाहीर तिसऱ्या यादीतही त्यांची नावे गाळण्यात आल्याने ही मंडळी चांगलीच संतप्त आहे. 
 

नेमके कारण तरी सांगा
कोविडचा प्रभाव हळूहळू कमी झाल्याने कर्मचाऱ्यांची कपात करणे ही बाब आम्ही समजू शकतो. मात्र, मग आम्हाला डावलून नवीन उमेदवारांना नियुक्ती कशी काय दिली जाते?, याची चौकशी झाली पाहिजे. उलट आतापर्यंत आम्हीच रुग्णालयात काम केल्याने त्याचा सर्वांना अनुभव आलेला आहे. आम्हाला केवळ आश्‍वासन देण्यात आले तसेच आमचा वापर करण्यात आला. आम्हाला कमी करण्याचे नेमके कारण तरी प्रशासनाने सांगावे.
- राहुल गावंडे, अन्यायग्रस्त कर्मचारी 

एकाचवेळी भरती होत असल्याने संभ्रम  
कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती तसेच नवीन कर्मचाऱ्यांची भरती याचा कुठलाही संबंध नाही. कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा ही हंगामी होती, त्यांची पदेसुद्धा वेगळी आहेत, मात्र नव्याने भरती करण्यात आलेली पदेसुद्धा वेगळी आहेत. केवळ एकाचवेळी जुन्या लोकांना काढून नवीन लोकांची भरती होत असल्याने हा संभ्रम आहे.
- डॉ. शामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती  

 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com