सौम्याला सुवर्ण, साक्षीला रजत

शशिकांत जामगडे
मंगळवार, 9 जुलै 2019

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : आफ्रिका खंडातील सामोआ देशात सुरू असलेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सौम्या दळवी हिने सुवर्णपदक, तर पुसद तालुक्‍यातील श्रीरामपूर येथील साक्षी मस्के हिने रजतपदक पटकावून महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे.

भारतीय भारोत्तोलन संघाद्वारे पंजाबमधील पटियाला येथे घेण्यात आलेल्या सराव शिबिरात 40 किलो युवा गटातून सौम्या दळवी हिने, तर श्रीरामपूर येथील साक्षी प्रकाश मस्के हिने 45 किलो वजनगटात उत्कृष्ट प्रदर्शन करीत आफ्रिका खंडातील सामोआ देशात झालेल्या वेटलिफ्टिंग ज्युनिअर कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेतला होता. 8 ते 14 जुलैदरम्यान झालेल्या स्पर्धेत सौम्याने 40 किलो वजनगटात सुवर्णपदक, तर साक्षीने 45 किलो वजनगटात रजतपदक पटकावून महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे.
साक्षीने दोन किलो वजन कमी उचलल्यामुळे तिला सुवर्णपदकाऐवजी रजतपदकावर समाधान मानावे लागले. साक्षी मस्के हिने यापूर्वी महापौर चषक राष्ट्रीय युवा व ज्युनिअर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तिला पुणे येथील प्रशिक्षक उज्ज्वला माने व पुसद येथील क्रीडा शिक्षक सुनील देशमुख, अविनाश कराळे, आनंद करडे, रोशन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soumya and sakshi won gold and silver respectivaly