Buldhana News : हार्वेस्टरने काढणी केलेल्या सोयाबीन खरेदीला ग्रेडर कडून रेड सिग्नल; शेतकऱ्यांने केला राडा; दिवस भर खरेदी केंद्र बंद!

Soybean Procurement Dispute : जळगाव जामोद येथील नाफेड केंद्रावर हार्वेस्टरने काढलेल्या सोयाबीनची खरेदी नाकारल्याने मोठा गोंधळ उडाला. दिवसभर केंद्र बंद राहिले असून शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला.
Farmer Outrage After NAFED Grader Rejects Harvester-Cut Soybean

Farmer Outrage After NAFED Grader Rejects Harvester-Cut Soybean

Sakal

Updated on

संग्रामपूर (बुलढाणा) : जिल्ह्यातील जळगांव जामोदयेथील नाफेडच्या सोयाबीन केंद्रावर आणलेले सोयाबीन हार्वेस्टर ने काढलले आहे असे म्हणत ग्रेडर ने घेण्यास मनाई केली. त्यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्याने लेखी द्या म्हणत एकतर माल मोजा नाहीतर मी जाळून घेतो. असे म्हणताच एकच खळबळ उडाली. आणि लगेच जळगावं जा पोलिसांना पाचारण करण्यात आले. हा प्रकार 10 डिसेंबर रोजी जळगावं जा मध्ये घडला असून दिवसभर संपूर्ण खरेदी बंद ठेवण्यात आली. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. दुसरे दिवशी सदर शेतकऱ्याची समजूत काढून माल सफाई करून आणा असे सांगण्यात आले. व खरेदी सुरु करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com