esakal | एका लग्नाच्या तारखा तीन, आई-वडिलांना सोडून वधू दुचाकीने निघाली एकटी

बोलून बातमी शोधा

Special marriage ceremony that took place in Yavatmal

संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे वारंवार विवाह पुढे ढकलले योग्य नाही. पाहुणे मंडळी नाही जमली तरी चालेल. चार लोकांत तीन एप्रिलला विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला. मात्र, तेही शक्‍य न झाल्याने मुलीने थेट दुचाकीने मुलाचे घर गाठून लग्न केले. 

एका लग्नाच्या तारखा तीन, आई-वडिलांना सोडून वधू दुचाकीने निघाली एकटी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना विषाणूने देशात शिरकाव केल्याने भयानक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देशात 21 दिवसांचा लाऊकडाऊन सुरू आहे. या काळात लग्न सोहळे, धार्मिक कार्यक्रम, होम-हवण अशा सर्व कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. यामुळे अनेकांनी लग्न पुढे ढकलले आहेत. मात्र, ज्यांचे लग्न आगोदरच ठरले असेल त्यांचे काय?, असाच एक विवाह सोहळा कोरोना येण्यापूर्वीच ठरला होता. मात्र, तो होऊन शकला नाही. यामुळे संतप्त वधूने हा निर्णय घेतला... 

यवतमाळ शहरातील नामवंत परिसरात राहणाऱ्या युवतीचा विवाह बाबुळगाव तालुक्‍यातील युवकाशी ठरला. साक्षगंधाचा कार्यक्रम नामवंत कार्यालयात मोठ्या थाटात पार पडला. तसेच त्यांचा विवाह नऊ मार्चला नियोजित करण्यात आला. दोघेही भावी जीवनाचे स्वप्न रंगवू लागले. भेटीगाठी होऊ लागल्या. दुसरीकडे मुला-मुलींच्या कुटुंबीयांनी लग्नाची जोरदार तयारी सुरू केली. लग्नपत्रिकाही छापल्या. घरात आनंदाचे वातावरण होते. 

महत्त्वाची बातमी - नवलचं की! महाराष्ट्रातील हा जिल्हा आहे 'कोरोना'मुक्‍त, आढळलाच नाही पॉझिटिव्ह रुग्ण

लग्नाची तारीख जवळ आली तितक्‍यात कोरोना विषाणूने देशात प्रवेश केला. यामुळे मोठी समस्या निर्माण झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात झाली. अशा परिस्थितीत कोणाला कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी नऊ मार्चला होणारा विवाह सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग कमी होईल आणि स्थिती सामान्य होईल या आशेवर 31 मार्चचा मुहूर्त काढला. 

मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे 31 मार्चलासुद्धा विवाह करणे शक्‍य झाले नाही. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. यामुळे नागरिकांना घराबाहेर निघनेही कठीण झाले. ही परिस्थिती कधी संपेल याची काहीही श्‍वाश्‍वती नसल्याने लग्न कधी करायचे असा प्रश्‍न दोन्ही कुटुंबीयांना पडला. संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे वारंवार विवाह पुढे ढकलले योग्य नाही. पाहुणे मंडळी नाही जमली तरी चालेल. चार लोकांत तीन एप्रिलला विवाह करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला. मात्र, तेही शक्‍य न झाल्याने मुलीने थेट दुचाकीने मुलाचे घर गाठून लग्न केले. 

प्रशासनाने नाकारली परवानगी

दोन्ही कुटुंबीयांनी घरच्या घरी लग्न करण्याचे ठरवले. यानंतर मुलीचे लग्न मुलाच्या घरी करण्यासाठी मुलीच्या मंडळींनी प्रशासनाला कार घेऊन जाण्याची परवानगी मागितली. मात्र, ती वेळेपर्यंत मिळाली नाही. आता काय करावं, असा प्रश्‍न मुलीच्या कुटुंबीयांना पडला. मग काय मुलीने वधूच्या वेशेत चक्‍क दुचाकीने वीस किलोमीटर अंतर पार करीत मुलाच्या घरी हजेली लावली. सायंकाळी मोजक्‍या चार लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला. 

सविस्तर वाचा - मुलगा अडकला मुंबईत अन् ईकडे आईला झाली देवाज्ञा...

मुलीचे आई-वडील अनुपस्थित

लग्नासाठी मुलीने दुचाकीने वीस किलोमीटरचे अंतर पार करीत मुलाचे घर गाठले. यावेळी मोजक्‍या चार पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा आटोपण्यात आला. नवरदेवाच्या घरीच अंतरपाट करून लग्न झाले. मात्र, येवढ्या मोठ्या सोहळ्याला मुलीचे आई-वडील सोबत नव्हते. संचारबंदीमुळे असा विवाह करण्याची वेळ दोन्ही कुटुंबावर आली.