विशेष पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांची अमरावतीत महत्त्वपूर्ण बैठक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अमरावती : राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक व अमरावतीचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (ता. 20) पोलिस आयुक्तालयात अमरावती विभागातील एसआयडी (राज्य गुप्तवार्ता विभाग)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

अमरावती : राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक व अमरावतीचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (ता. 20) पोलिस आयुक्तालयात अमरावती विभागातील एसआयडी (राज्य गुप्तवार्ता विभाग)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक लक्षात घेता निवडणूक काळात काय दक्षता घ्यायला हवी. याबाबत अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यांतील एसआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित केले. पोलिस आयुक्तालयाच्या सभागृहात ही बंदद्वार बैठक तब्बल दोन तास चालली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी अमितेशकुमार यांची भेट घेतली असता निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु, बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत त्यांनी भाष्य करण्याचे टाळले. अमरावतीचे पोलिस आयुक्त असताना त्यांनी पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काही महत्त्वाचे पाऊल उचलले होते. त्यामुळे अमितेशकुमार शहरात दाखल होते. त्यांच्या भेटीसाठी पोलिस कर्मचाऱ्यांसह आस्थापना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांनीही धाव घेतली. त्यांनीही कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी केली. एसआयडीच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी दोन्ही पोलिस उपायुक्तांसोबतही चर्चा केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special meeting of I.G. Amitesh Kumar at Amravati