मेट्रोचा वेग ताशी 90 किलोमीटर

मेट्रोचा वेग ताशी 90 किलोमीटर
नागपूर : शहरातील मेट्रो आता पूर्ण रंगात येत असून गेल्या सात दिवसांत ताशी 90 किलोमीटर वेगाने धावली. या वेगासह मेट्रोने सीताबर्डी ते खापरीपर्यंतचा प्रवास 20 मिनिटांत पूर्ण केला. त्यामुळे नागपूरकरांना आता खऱ्या अर्थाने मेट्रोच्या वेगाचा अनुभव घेता येणार आहे.
गेल्या सात दिवसांपासून रिसर्च डिझाइन अँड स्टॅंडर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) मेट्रो रेल्वेच्या वेगाची चाचणी घेतली. ही चाचणी काल, शुक्रवारी संपुष्टात आली. "आरडीएसओ'ने सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन या 11.5 किमी लांबीच्या मार्गावर ही चाचणी घेतली. मेट्रो कोचेसमध्ये चार हजार पोती भरून 90 किमी प्रतितासाने चाचणी घेण्यात आली. या मार्गावर आरडीएसओने मेट्रोच्या वेगाचे निरीक्षण नोंदविले. 970 प्रवाशांच्या वजनाइतकी म्हणजे 63 टन रेतीची पोती ट्रेन मध्ये भरण्यात आली होती. गाडीतयंत्राच्या साहाय्याने गतिमर्यादा आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या कंपनाची नोंद घेण्यात आली. सुरुवातीला पूर्णपणे रिकाम्या आणि नंतर पूर्ण वजनाने भरून 50 किमी वेगाने मेट्रो चालविण्यात आली. हळूहळू वेग ताशी 90 किमीपर्यंत करण्यात आला. ताशी 90 च्या वेगातही मेट्रो उत्तीर्ण झाली. महामेट्रोला 15 दिवसांत ताशी 90 किमी चाचणीचा अहवाल सादर करायचा होता. सात दिवसांत हा अहवाल सादर करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com