यवतमाळ बंदोबस्ताहून परतलेले एसआरपीएफचे ५९ जवान कोरोना पॉझिटिव्ह!

carona
carona

यवतमाळ : जिल्ह्यात बकरी ईदच्या बंदोबस्तासाठी आलेले नागपूर येथील राज्य राखीव दलाचे (एसआरपीएफ) ५९ जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. येथील बंदोबस्त आटोपून नागपूर येथे गेल्यावर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यात हे वास्तव समोर आले.

सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या जवानांचा बंदोबस्त लावला जातो. नुकत्याच पार पडलेल्या बकरी ईदसाठी नागपूरहून एसआरपीएफ जवानांची तुकडी यवतमाळ जिल्ह्यात बंदोबस्तासाठी आली होती. त्यांचा पाच ठिकाणी बंदोबस्त होता. येथील बंदोबस्त आटोपून नागपूर येथे गेल्यावर सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात ५९ जवान कोरोना पॉझिटिव्ह निघालेत.

जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस कर्मचारी व पीएसआय दर्जाचा अधिकारी पॉझिटिव्ह निघाले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिस ठाणेनिहाय रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट घेणे सुरू करण्यात आले आहे. एसआरपीएफ जवानांची स्वतंत्र व्यवस्था होती. स्थानिक पोलिस त्यांच्या संपर्कात आले नाही, असे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, जिल्ह्यात आलेले ५९ जवान पॉझिटिव्ह निघाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

पोलिसांतही लागण
मार्च महिन्यापासून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी सातत्याने सेवा बजावत आहेत. दोन पोलिस कर्मचारी व एका पीएसआयला कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते झाले आहेत. तर, अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होते आहे.

स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती
जिल्ह्यातील बंदोबस्त आटोपून नागपुरात आल्यानंतर एसआरपीएफच्या ५९ जवानांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा कोणत्याही पोलिस कर्मचाऱ्यासोबत संपर्क आला नाही. सर्वांची स्वतंत्र राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. रॅपिड अ‍ॅन्टिजन आल्यापासून पोलिस ठाणेनिहाय कर्मचारी व अधिकाऱ्यांची टेस्ट करण्यात येत आहे.
एम. राजकुमार
पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com