शेगावात प्रकटदिनी उसळला भक्तिसागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

शेगाव - "गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', "गण गण गणात बोते'च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांच्या 140 वा प्रकटदिनी बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला.

शेगाव - "गजानना अवलीया, अवतरले जग ताराया', "गण गण गणात बोते'च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराज यांच्या 140 वा प्रकटदिनी बुधवारी लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रकट दिनानिमित्त एक फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरवात झाली आहे. उत्सवात राज्यभरातील तब्बल एक हजाराच्यावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. आज सकाळपासून दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी 12 वाजता गुलाबपुष्प, गुलाल उधळून श्रींचा प्रकट सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

पालखीची मेणा, गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महारुद्र स्वाहाकार यज्ञाची पूर्णाहूती झाली.

Web Title: sshegav news vidarbha news gajanan maharaj birth anniversary

टॅग्स